Yashomati Thakur: ठाकरे सरकारच्या भवितव्याबाबत यशोमती ठाकूर यांचे मोठे विधान; म्हणाल्या…

हायलाइट्स:

  • महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करणार
  • काँग्रेसच्या मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांना विश्वास.
  • राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठ्या मनाचे!

जळगाव: ‘महाविकास आघाडीचे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आहे, हे मी ठामपणे सांगू शकते. राज्याचे मुख्यमंत्री हे फार व्यापक दृष्टीकोन असलेले व मोठ्या मनाचे नेते आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळेच सरकार व्यवस्थित व स्थिर चालते आहे आणि चालणार असून पाच वर्षेही पूर्ण करेल’, असा विश्वास आज काँग्रेस नेत्या तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. ( Yashomati Thakur On Maha Vikas Aghadi Govt )

वाचा: भाजप-मनसे युतीत ‘हा’ अडथळा; पाटील-राज भेटीवर फडणवीस बोलले…

स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेस एखादवेळी स्वबळावर लढेल, ते काही चुकीचे नाही. पण महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्रपणे आहोत ही एकच वास्तविकता असल्याचेही मंत्री यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७५ वर्षे पूर्ण करत असल्याने काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘व्यर्थ न हो बलिदान’ हा देशव्यापी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याच अनुषंगाने आज जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयात अॅड. यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर मंत्री अॅड. ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे आणि पाच वर्षे स्थिर राहील असे ठामपणे सांगितले.

वाचा:आरक्षणावर फडणवीसांची नवी भूमिका; म्हणाले, ‘तो संघर्ष टाळण्यासाठी…’

केंद्राकडून जर लसीकरणात राजकारण करण्यात आले नसते तर आजपर्यंत देशात ५० टक्केपेक्षा जास्त लसीकरण पूर्ण झाले असते, असा आरोप यावेळी अॅड. यशोमती ठाकूर यांनी केला. आपल्या देशात करोना वरील लशींचे राजकारण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. सध्या देशात केवळ ३० टक्के लोकांचा लसीकरणाचा पहीला डोस पूर्ण झाला आहे. अजून बालकांचे लसीकरण झाले नसल्याने आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने उपायोजना कराव्या लागल्यात. लसीकरणाच्या संथगतीला केंद्र शासन जबाबदार असल्याचे ठाकूर म्हणाल्या. यावेळी शासनाकडून संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच कोविड मुळे पालक गमावलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी देखील शासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा तपशील त्यांनी दिला.

इतिहास बदलण्याचा घाट

देशाचा इतिहास मोडण्याचा प्रयत्न होत आहे. खोट्या गोष्टी छापून त्या खऱ्या असल्याचे सागंण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे ‘व्यर्थ न हो बलिदान’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकपर्यंत देशाचा खरा इतिहास पोहचविण्याचे काम काँग्रेसकडून केले जात असल्याची माहीती यावेळी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. खेल रत्न पुरस्काराच्या नाम बदलावरुन मंत्री ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राजीव गांधी खूप व्यापक व मोठ्या मनाची व्यक्ती होती. ते असते तर त्यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले असते. पण, पंतप्रधान किती कुत्सीत मनाचे आहेत ते या ठीकाणी दिसत आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागतच केले आहे पण, वेगळ्याप्रकारे देखील या गोष्टी हाताळता आल्या असत्या असेही त्या म्हणाल्या.

वाचा: मुंबईत बॉम्बची दहशत पसरवणाऱ्या कॉलचं गटारी कनेक्शन!; पोलीस हैराण

Source link

yashomati thakur latest newsyashomati thakur on covid vaccinationyashomati thakur on maha vikas aghadiyashomati thakur on maha vikas aghadi govtyashomati thakur uddhav thackeray latest newsउद्धव ठाकरेकाँग्रेसनरेंद्र मोदीमहाविकास आघाडी सरकारयशोमती ठाकूर
Comments (0)
Add Comment