पुणे:मोबाईल व इंटरनेटचे दुष्परिणाम चर्चासत्र
आज दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी आझम कॅम्पसमधील अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलमध्ये मोबाईलचे विद्यार्थ्यांवर होणारे दुष्परिणाम या विषयावर पालकांसाठी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.यावेळी ५०० पेक्षा जास्त पालकांनी या चर्चासत्रात भाग घेतला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रशालेचे प्राचार्य श्री राज मुजावर सर यांनी पालकांचे उदबोधन केले.संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी ए इनामदार यांनी घेतलेल्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या विध्यार्थ्यांना शाळेत मोबाईल आणता येणार नाही याविषयी प्राचार्य राज मुजावर सर यांनी पालकांना माहिती दिली.विविध पी पी टी च्या माध्यमातून इंटरनेट व मोबाईलमुळे आजचे विध्यार्थी कसे या मोहजालात ओढले जात आहेत याविषयी पालकांना जागृत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहा.शिक्षक श्री जफर खान यांनी व आभारप्रदर्शन प्रशालेच्या उपप्राचार्य सौ परवीन मुजावर यांनी केले.