हायलाइट्स:
- ठाण्यातील कलव्यामध्ये कोसळली दरड
- ६ घरांचं मोठं नुकसान
- कोणतीही जीवितहानी झालेली नाही
ठाणे : ठाण्यातील कळवा पूर्वेतील इंदिरा नगरमध्ये असलेल्या माँ काली चाळ येथे शनिवारी रात्री उशिरा भूस्खलनामुळे सहा घरांचे नुकसान झाले आहे. ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी, आरडीएमसी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अधिक माहितीनुसार, खबरदारी म्हणून जवळच्या घरांतील रहिवाशांना आरडीएमसी टीम आणि अग्निशमन दलाच्या मदतीने घोलाई नगरमधील टीएमसी शाळेत हलवण्यात आले आहे. तर त्याचवेळी, गेल्या महिन्यात रायगडच्या तळिये गावात भीषण भूस्खलनामुळे घरे गमावलेल्या पीडितांना मदत देण्यात आली आहे.
रायगड जिल्हा प्रशासनाला तालीये गावातील रहिवाशांना तात्पुरती निवास व्यवस्था देण्यासाठी २६ कंटेनर घरे देण्यात आली आहेत. कारण घरं बांधण्याची प्रक्रिया खूप मोठी आहे. त्यामुळे सध्या ही कंटेनर घरे दिली जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.