कंपनी या प्लानमध्ये ७० दिवसाची वैधता ऑफर करते. इंटरनेट यूज करण्यासाठी या प्लानमध्ये तुम्हाला डेली ३ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये ४८ जीबी एक्स्ट्रा डेटा फ्री मिळतो. रोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला अनेक शानदार अतिरिक्त बेनिफिट्स मिळते.
वाचा: Xiaomi : शाओमीचं फॅन फेस्टिवल, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काऊंट, किंमती वाचून चकित व्हाल!
प्लानध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिटमध्ये एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शनचा समावेश आहे. याशिवाय, वोडाफोन आयडियाचा हा प्लान बिंज ऑल नाइट, विकेंड डेटा रोलओव्हर आणि वोडाफोन आयडिया मूव्हीज आणि टीव्ही अॅपचे फ्री अॅक्सेस देते. प्लानमध्ये कंपनी डेटा डिलाइट्स बेनिफिट् दर महिन्याला २ जीबी पर्यंत बॅक अप डेटा सुद्धा ऑफर केले जाते.
वाचा: कमी बजेटमध्ये स्मार्टफोन हवाय? टेन्शन नाही, १० हजार रुपयांच्या आत आहेत हे ५ बेस्ट स्मार्टफोन्स
जिओचा ८९९ रुपयाचा प्लान
रिलायन्स जिओचा हा प्रीपेड प्लान अनेक जबरदस्त बेनिफिट्स सोबत येतो. या प्लानमध्ये तुम्हाला ९० दिवसाची वैधता मिळते. प्लानमध्ये कंपनी डेली २.५ जीबी या हिशोबाप्रमाणे एकूण २२५ जीबी डेटा देत आहे. कंपनी या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस देत आहे. प्लानमध्ये मिळणारे अतिरिक्त बेनिफिट मध्ये जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा सारख्या अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.
वाचाः मस्तच! अँड्रॉईडमध्ये येणार आयफोनसारखा फील, Whatsapp मध्ये होतोय हा मोठा बदल