कसा आहे जिओचा ६९९ रुपयांचा प्लॅन?
रिलायन्स जिओच्या ६९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 100GB डेटा देण्यात आला आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा संपल्यानंतर, ग्राहक १० रुपये प्रति जीबी दराने इंटरनेट वापरू शकतात. जिओच्या या परवडणाऱ्या पोस्टपेड प्लॅनमध्ये तीन अॅड-ऑन फॅमिली सिम कार्ड देखील दिले जातात. प्लॅनमध्ये प्रत्येक फॅमिली सिमकार्डसाठी दरमहा ५ जीबी अतिरिक्त डेटा देखील मिळतो. याशिवाय रिलायन्स जिओचा हा प्लान अमर्यादित व्हॉईस कॉलसह येतो. म्हणजेच, ग्राहक देशभरात अमर्यादित STD आणि रोमिंग कॉलचा लाभ घेऊ शकतात. तसंच या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १०० एसएमएस मोफत मिळतात. तसंच अॅड-ऑन फॅमिली सिम कार्डसाठी दर महिन्याला ९९ रुपये आकारले जातात. याशिवाय 5G डेटा वापरणाऱ्यां Jio ग्राहकांना या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G इंटरनेट मिळेल.
ऑफरमध्ये काय आहे खास?
तर या प्लॅनमध्ये एक खास गोष्ट म्हणाल तर Netflix आणि Amazon Prime चे मोफत सबस्क्रिप्शन. तर
OTT सबस्क्रिप्शनबद्दल बोलायचं झालं तर ग्राहकांना या प्लॅनमध्ये Netflix आणि Amazon Prime या दोन सर्वात प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मती फ्री मेंबरशिप देखील मिळते. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन देखील या प्लॅनमध्ये मोफत दिले जाते.
वाचा: Xiaomi : शाओमीचं फॅन फेस्टिवल, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काऊंट, किंमती वाचून चकित व्हाल!
जिओचा १४९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
तर जिओच्या सर्वात महागड्या प्लॅनपैकी एक असणाऱ्या दरमहा १४९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये मोफत नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल आणि रोजचा एसएमएस यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. डेटाबद्दल बोला, जिओ ग्राहक या प्लॅनमध्ये एकूण 300GB डेटाचा लाभ घेऊ शकतात.
वाचा: कमी बजेटमध्ये स्मार्टफोन हवाय? टेन्शन नाही, १० हजार रुपयांच्या आत आहेत हे ५ बेस्ट स्मार्टफोन्स