नवी दिल्ली: Know Poco C51 Features : कमी बजेटमध्ये स्मार्टफोन घ्यायचाय? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. दर तुम्हीही १० हजार रुपयांमध्ये नवीन मोबाईल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एक आनंदाची बातमी आहे. मोबईल कंपनी Poco ने नुकताच (७ एप्रिल) भारतीय बाजारात Poco C51 हा एक स्वस्त पण मस्त फोन लॉन्च केला आहे. कंपनीने 7GB पर्यंत रॅम सपोर्ट करणारा 5000 mAh बॅटरी आणि MediaTek Helio G36 प्रोसेसर असणारा Poco C51 लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे या फोनची किंमत केवळ ९,९९९ इतकीच असल्याने या फोनची विक्री भरपूर प्रमाणात होईल अशी आशा कंपनी व्यक्त करत आहे. वाचा: कमी बजेटमध्ये स्मार्टफोन हवाय? टेन्शन नाही, १० हजार रुपयांच्या आत आहेत हे ५ बेस्ट स्मार्टफोन्स
तर पोकोने Poco C51 4GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेजसह लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 9,999 रुपये आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टद्वारे तुम्ही मोबाईल फोन खरेदी करू शकाल. या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर, Poco C51 मध्ये तुम्हाला 6.5-इंचाचा डिस्प्ले मिळेल जो 120hz च्या रीफ्रेश रेटसह येईल. स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. विशेष म्हणजे तुम् याही मोबाईल फोनची रॅम 7GB पर्यंत वाढवू शकता. हा स्मार्टफोन MediaTek Helio G36 प्रोसेसर आणि 10W चार्जरसह 5000 mAh बॅटरी असणार आहे. फोटोग्राफीसाठी, मोबाइल फोनमध्ये 8 मेगापिक्सेल ड्युअल एआय कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. मोबाईल फोनच्या सुरक्षेसाठी यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही उपलब्ध आहे. एकंदरीत, हा एक बजेट स्मार्टफोन आहे जो कमी किंमतीत चांगल्या दर्जाचा मोबाईल फोन शोधत असलेल्या लोकांसाठी बेस्ट ऑप्शन आहे.

Poco M5 ही आहे एक चांगला ऑप्शन
दरम्यान तुम्ही पोको कंपनीचाच एखादा फोन पाहत असाल आमि तुमचं बजेट थोडं आणखी जास्त आहे, तर POCO M5 हा ही एक पर्याय आहे.या फोनचा 4gb रॅम आणि 64gb स्टोरेज वाला स्मार्टफोन १०, ९९९ रुपयांना असन या स्मार्टफोनमध्ये ७.५८ इंच FHD+ डिस्प्लेसह 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. तसंच फोनमध्ये MediaTek G99 प्रोसेसर सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन Amazon आणि Flipkart वरून खरेदी करता येईल.
वाचाः मस्तच! अँड्रॉईडमध्ये येणार आयफोनसारखा फील, Whatsapp मध्ये होतोय हा मोठा बदल