Pune.फरारी गुन्हेगारास अटक ! Unit 1 गुन्हे शाखा

‘मोक्का’ कारवाईनंतर

पोलिसांना गुंगारा देणारे दोघे अटकेत

युनिट – १, खडक पोलिसांची कामगिरी

पुणे, दि. ७ – ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर फरार झालेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट – १ आणि खडक पोलिसांच्या पथकाने अटक केली. यांतील मुख्य आरोपीला उरुळी कांचन येथून, तर त्याच्या साथीदाराला कात्रज येथून सापळा रचून बेड्या ठोकण्यात आल्या.

घोरपडे पेठेतील टोळीप्रमुख विशाल ऊर्फ जंगल्या सातपुते (वय ३२, रा. उरुळी कांचन, मूळ घोरपडे पेठ) याला युनिट-१ने उरुळी कांचन येथून अटक केली. शुक्रवार पेठेतील शिंदे आळीत जोरात गाडी चालवू नको, असे एका तरुणाने सांगितल्याच्या कारणावरून उमेश वाघमारे, आदित्य बनसोडे, मंदार खंडागळे, कुमार लोंढे आणि साथीदारांनी सातपुते याच्या सांगण्यावरून तरुणाला मारहाण करून खूनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून टोळीप्रमुख सातपुते फरार होता. तो उरुळी कांचन परिसरात असल्याची माहिती अंमलदार अमोल पवार यांना मिळाली. त्यानुसार उपायुक्त अमोल झेंडे, युनिट-१ चे वरिष्ठ निरीक्षक शबीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार अमोल पवार, इम्रान खान, अण्णा याने, नीलेश साबळे, महेश बामगुडे यांच्यासह पथकाने सातपुतेला ताब्यात घेतले.

Comments (0)
Add Comment