एसीची गरज भासणार नाही, घरात ठेवा हा छोटा फॅन, उन्हाळ्यात थंडी वाजणार

नवी दिल्लीः दरवर्षी उन्हाळ्यात एसी किंवा कूलरची मागणी वाढत असते. अनेक जण एसीची खरेदी करतात. परंतु, एसीची किंमत जास्त असल्याने काही लोकांना एसी खरेदी करणे परवडत नाही. त्यामुळे अनेक जण कूलर किंवा छोट्या पंख्याचा उपयोग करीत असतात. तुम्ही जर एक कमी किंमतीचा एसी खरेदी करायचा विचार करीत असाल तर तुम्हाला एका पोर्टेबल Air Cooler किंवा मिनी AC चा ऑप्शन डोक्यात ठेवावा लागेल. हे कमी खर्चात उपलब्ध होत असतात. तुम्हाला भर उन्हाळ्यात हे गारवा देण्यात सक्षम असतात.

खूपच शानदार

हे एअर कूलर पर्सनल यूजसाठी किंवा ऑफिस टेबल पासून कँपिंग पर्यंत उपयुक्त आहे. याची छोटी साइज असल्याने कुठेही यूज करता येवू शकते. तसेच याची किंमत सुद्धा कमी आहे. जर तुम्हाला प्रत्येक खोली एसी लावायचा असेल तर ते तुमच्यासाठी खूप महाग ठरू शकते. त्यामुळे तुम्ही वर्कप्लेस वर कूलिंगचा विचार करीत असाल तसेच तुमचे बजेट कमी असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. बाजारात असे एअर कंडिशनर उपलब्ध आहेत. जे काही मिनिटात शानदार कूलिंग देतात. तसेच याची किंमतही खूपच कमी आहे.

वाचाः अरे व्वा! ५९,९९९ हजारांच्या गूगल पिक्सल 7 वर तगडी सूट, पार निम्म्या किंमतीला खरेदी करण्याची सुवर्णसंधी

किंमत खूपच कमी
याला अमेझॉनवरून सहज स्वस्त किंमतीत खरेदी करता येऊ शकता येते. या पोर्टेबल एसीला खूपच कमी किंमतीत अमेझॉनवरून खरेदी केले जावू शकते. आम्ही ज्या पोर्टेबल एसी संबंधी बोलत आहोत. त्याची किंमत १८ हजार ७३३ रुपये आहे. परंतु, याला ७४ टक्के डिस्काउंट सोबत फक्त ४ हजार ८१० रुपये किंमतीत खरेदी करू शकतो. तसेच हे खूपच हलके सुद्धा आहे. याला कुठेही घेऊन जावू शकता येते.

वाचा: Xiaomi : शाओमीचं फॅन फेस्टिवल, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काऊंट, किंमती वाचून चकित व्हाल!

काय आहे खास वैशिष्ट्ये
या प्रोडक्टचे वॉटर टँक ५०० मिलीलीटरचे आहे. याला एकदा भरल्यानंतर ३ ते ५ तास पर्यंत काम करते. फॅनच्या वेगावर हे अवलंबून आहे. याच्या टँक मध्ये तुम्ही आइस ब्लॉक्स सुद्धा टाकू शकता. याचा वापर खूप सोपा आहे. तुम्हाला फक्त टँक मध्ये पाणी टाकून बटन दाबायचे आहे. हे प्रोडक्ट ३ विंग स्पीड्स सोबत येते. यात ७ कलर्स सोबत नाइट लाइट सुद्धा आहेत. हे एक यूनिक टेक्नोलॉजी सोबत येते. जे नॉइसला कमी करण्यात मदत करते.

वाचाः स्मार्टफोनची बॅटरी लवकर खराब होण्यामागे ‘ही’ पाच कारणं, ब्लास्ट होण्याचीही भीती

Source link

Portable ACportable ac discount priceportable ac in budgetportable ac in indiaportable ac on amazonportable ac price
Comments (0)
Add Comment