Lava Blaze 2 भारतात लाँच, कमी किंमतीत ११ जीबी रॅम व खास फीचर्स

नवी दिल्लीःLava Blaze 2 : लावा ने जुलै २०२२ मध्ये भारतीय मार्केटमध्ये आपला लावा ब्लेज स्मार्टफोन लाँच केला होता. तेव्हापासून कंपनीने लावा ब्लेज NXT, लावा ब्लेज प्रो आणि लावा ब्लेज 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. आता ब्रँडने ब्लेज लाइनअप अंतर्गत एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने सोशळ मीडियाद्वारे या फोनला आज लाँच केले आहे.

या फोनमध्ये 11GB रॅम ऑप्शन मध्ये लाँच करण्यात आले आहे. ज्यात ६ जीबी प्लस ५ जीबी रॅमचा समावेश आहे. फोनमध्ये चार्जिंगसाठी टाइप सी पोर्ट दिले आहे. फोनमध्ये १२८ जीबी पर्यंत मेमरी दिली आहे. फोनमध्ये मल्टीटास्किंगचे सपोर्ट दिले आहे. फोनमध्ये फेसलॉक आणि साइड मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर सारखी सुविधा दिली आहे. लावाच्या या फोनमध्ये फ्री सर्विस ऑफर केली जात आहे. अमेझॉनच्या लिस्टिंगनुसार, फोनमध्ये काही खराबी आढळल्यास फोनची सर्विस घरी येवून केली जाईल.

वाचाः एसीची गरज भासणार नाही, घरात ठेवा हा छोटा फॅन, उन्हाळ्यात थंडी वाजणार

Lava Blaze 2 चा कॅमेरा आणि किंमत
लावाच्या या फोनमध्ये 13MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिले आहे. फोनचा कॅमेरा मध्ये मल्टीपल मोड दिले आहेत. ज्यात पोर्ट्रेट, नाइट, एआय मोड, प्रो मोड, ब्यूटी, स्लो, मोशन फोटो, ऑडियो नोट, टाइम, फिल्टर आणइ एचडीआर आदीचा समावेश आहे. Lava Blaze 2 ला तीन कलर ऑप्शन मध्ये लाँच करण्यात आले आहे. ज्यात ग्लास ब्लू, ग्लास ब्लॅक आणि ग्लास ऑरेंजचा समावेश आहे. फोनला ८ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले आहे. फोनची विक्री १८ एप्रिल पासून सुरू केली जाणार आहे.

वाचाः एकच नंबर! ७५ इंचाच्या टीव्हीवर मिळवू शकता ६५ हजारांची सूट, काय आहे ऑफर?

Source link

Lava Blaze 2Lava Blaze 2 featuresLava Blaze 2 LaunchedLava Blaze 2 priceLava Blaze 2 saleलावा स्मार्टफोन
Comments (0)
Add Comment