अलीकडेच एका ६५ वर्षीय व्यक्तीची अशाचप्रकारे फसवणूक झाली. त्यांनी एका मॅरेज पोर्टलवर पुन्हा लग्न करण्यासाठी नोंदणी केली होती. ज्यानंतर पोर्टलवर एका महिलेशी बोलण्यासही सुरुवात केली. दोघांनीही नंबरची देवाणघेवाण केली. ज्यानंतर व्हिडिओ कॉलही झाला. वृद्धाने पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे त्या महिलेने व्हिडीओ कॉलवर तिचे कपडे काढण्यास सुरुवात केली आणि व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्तीलाही कॅप्चर केलं. ज्यानंतर त्या वृद्धाला अब्रूनुकसानीच्या भीतीने ब्कॅकमेल करत तब्बल 60 लाख रुपयांना लुटलं. अशाच अनेकप्रकारे स्कॅमर्स ऑनलाईन फ्रॉड करतात, त्यातीलच काही प्रकारांबद्दल जाणून घेऊ…
कसा होतो ऑनलाईन स्कॅम?
एखाद्या व्यक्तीच्या नावाने कर्ज, व्हिडिओ कॉलवर ब्लॅकमेलिंग, ईमेल फ्रॉड हे काही मार्ग आहेत ज्याप्रकारे आजकाल घोटाळे होत आहेत. आजकाल OTP फसवणूक वाढली आहे. काही वेळा तुमच्याकडून थेट OTP मागितला जातो, तर कधी कोणतीतरी ऑफर किंवा काहीतरी आमिष दाखवून OTP घेतला जातो. अशा घोटाळ्यांमध्ये, स्कॅमर तुमच्या घरी कॅश ऑन डिलिव्हरीची ऑर्डर आणतात. जेव्हा लोक त्यांना घेण्यास नकार देतात तेव्हा ते ते रद्द करण्यास सांगतात आणि नंतर ओटीपी मागतात, जो बनावट ग्राहक सेवाच्या नावाने येतो. लोक हा OTP सांगताच. त्याचे खाते रिकामे होते.
वाचा: Xiaomi : शाओमीचं फॅन फेस्टिवल, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काऊंट, किंमती वाचून चकित व्हाल!
बनावट ग्राहक सेवा
फसवणूक होण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे लोक कोणतीही माहिती मिळवण्यासाठी गुगल सर्च करतात. घोटाळेबाज बनावट वेबसाइटच्या माध्यमातून बनावट ग्राहक सेवांच्या नावाने क्रमांक नोंदवतात. जेव्हा लोक शोधतात तेव्हा हा नंबर येतो. लोक त्यांना फोन करतात तेव्हा त्यांची फसवणूक होते. रेल्वे तिकीट परत देण्याच्या नावाखाली अशाच फेक वेबसाईटवरुन लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर येत असतात.
वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
फिशिंग लिंक
कधी फोन, सोशल मीडिया अकाऊंट यावरुनही गंडा घातला जातो. या सर्व हल्ल्यांनाच फिशिंग असं म्हणतात. ईमेलवरुन फिशिंग होते. तसंच फोनवरुन होणारे घोटाळे हे ‘विशिंग’ म्हणून तर सोशल मीडियावरील स्कॅमना ‘स्मिशिंग’ म्हणतात. फिशिंग करताना फिशिंग ज्या व्यक्तीची करणार असतात त्याला चूकीची माहिती पुरवली जाते. तसंच अनेकदा ओळखीच्या व्यक्तीकडून ईमेल किंवा सोशल मीडियावर मेसेज येतो. आपणही व्यक्ती ओळखीची असल्याने सर्व काही शेअर करतो. त्यानंतर आपली सर्व इन्फो त्याच्याकडे पोहचली जाते. उदाहरणार्थ जसं की तुमच्या बॉसकडून तुम्हाला ईमेल आलेला असतो, त्यामुळे तुम्ही जे विचारले जाते ते कोणताही विचार न करता उत्तर देऊन टाकता. ज्यामुळे तुमची सर्व माहिती समोरच्याला मिळून जाते
वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
सेक्सटोर्शन
आता या पद्धतीचं नाव वाचनूच कळून येतं की यामध्ये महिलांचा वापर केला जातो. ज्यामध्ये कोणत्याही मेसेजिंग अॅपद्वारे खासकरुन व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉलद्वारे लोकांना गंडा घातला जातो. यामध्ये अनेकदा DP वर एका महिलेचा फोटो असलेला व्हॉट्सअॅप मेसेज येतो. आपल्यातील अनेकांना असा मेसेज कधीतरी आलेलाच असतो. जर तुम्ही त्याला ब्लॉक करुन रिपोर्ट केलं नाहीतर नंतर आणखी मेसेज येतील तुम्हीबी रिप्लाय दिल्यावर मग कधीतरी व्हिडिओ कॉल्स येऊ शकतात, ज्यामध्ये एखादी महिला आक्षेपार्ह स्थितीत असेल. त्यानंतर समोरील व्यक्ती कॉल डिस्कनेक्ट करण्याचा विचार करणार तोवर स्क्रीन रेकॉर्डिंग करुन स्कॅमर व्हिडिओ बनवतात आणि नंतर त्या लोकांना या व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल केले जाते.
वाचाः Phone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
फेक ऑफर
अनेक वेळा हे स्कॅमर्स एखादी लॉटरी किंवा बक्षीस मिळालं आहे अशा प्रकारच्या अगदी अवाक करणारे मेसेज पाठवतात. ज्यानंतर तुमच्या त्या मेसेजला प्रतिसाद देताच तुमची इन्फो काढू बघतात. यात लोकांना मेसेज येतात की ते घरी बसून हजारो रुपये कमवू शकतात. तसंच लाखोंची, करोडोंची लॉटरी लागल्याचं मेसेजही अनेकांना येतात. यामध्ये एसएमएस किंवा लिंक पाठवली जाते. या लिंकवर क्लिक करताच रिस्पॉन्स करणाऱ्याच्या खात्यातील पैसे उडवले जातात. या सर्वापासून बचावाकरता कायम सतर्क राहिलं पाहिजे. अनोळखी आणि संशयास्पद मेल किंवा नंबरवरुन कॉन्टॅक्ट झाल्यास संबधित मेल किंवा नंबरला रिपोर्ट आणि ब्लॉक केलं पाहिजे. तसंच सर्व खात्यांचे मग सोशल मीडिया अकाऊंट किंवा बँक अकाऊंट या सर्वांचे पासवर्ड अगदी स्ट्राँग ठेवून ते वेळोवेळी बदलले देखील पाहिजेत.
वाचा: कमी बजेटमध्ये स्मार्टफोन हवाय? टेन्शन नाही, १० हजार रुपयांच्या आत आहेत हे ५ बेस्ट स्मार्टफोन्स