नवी दिल्ली :Jio Recharge Plan: देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना एकापेक्षा एक नवनवीन मोबाईल प्लॅन ऑफर करत असते. यापैकी अनेक प्लॅन्स असेही आहेत, जे इतर कंपन्याच्या तुलनेत अधिक फायदेशीर आहेत. पण मागील काही काळात सर्वच कंपन्या आपले मोबाईल प्लॅन्सची किंमत वाढवत आहे. पण या महागाईमध्ये जिओने एक खास प्लॅन त्यांच्या ग्राहकांसाठी आणला आहे. या प्लॅनमध्ये १०० रुपयांपेक्षा कमी म्हणजेच ९१ रुपयांमध्ये एक खास रिचार्ज प्लॅन देत आहे. यामध्ये कॉलिंग, एसएमएस, डेटा, ओटीटी हे सारे फायदे मिळणार आहेत.प्लॅन एक फायदे अनेक
तर Jio आपल्या वापरकर्त्यांना 91 रुपयांचा प्लॅन ऑफर करत असून यामध्ये अनेक फायदे ग्राहकांना मिळणार आहेत. या प्लॅनची वैधता 28 दिवसांपर्यंत असणार आहे. यामध्ये 3GB हायस्पीड इंटरनेट सुविधा देण्यात आली आहे. इतर फायद्यांबद्दचा विचार केला तर कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय 50 SMS, Jio Cinema, Jio TV आणि Jio Cloud सारख्या सर्व जिओ OTT अॅप्सना मोफत अॅक्सेस मिळणार आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिओच्या सर्व सिम ग्राहकांना या प्लॅनचा लाभ मिळू शकणार नाही.

वाचा: Xiaomi : शाओमीचं फॅन फेस्टिवल, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काऊंट, किंमती वाचून चकित व्हाल!
‘या’ प्लॅनचा फायदा फक्त ‘या’ यूजर्सनाच मिळणार
Jio चा 91 रुपयांचा प्लॅन सर्व यूजर्ससाठी नाही. याचा फायदा फक्त जिओ कंपनीचा मोबाईल अर्थात जिओफोन (JioPhone) वापरणाऱ्यांनाच होणार आहे. त्यामुळे या खास ऑफरचा लाभ JioPhone वापरकर्तेच घेऊ शकतात. जर देखील हा JioPhone घ्यायचा असेल, तर तुम्ही तो 1,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. JioPhone कंपनीच्या अधिकृत साइटवर उपलब्ध आहे. याशिवाय हा फोन इतर ई-कॉमर्स साइटवरही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ऑफलाइन स्टोअरमधूनही फोन खरेदी करू शकता.
वाचा: कमी बजेटमध्ये स्मार्टफोन हवाय? टेन्शन नाही, १० हजार रुपयांच्या आत आहेत हे ५ बेस्ट स्मार्टफोन्स