हायलाइट्स:
- संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ .नरेंद्र कुंटे यांचे निधन.
- दयानंद महाविद्यालयात मराठीचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
- पू. गुरुदेव रानडे परिवारातील ते ज्ञानवंत साधक होते.
सोलापूर: संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ .नरेंद्र कुंटे यांचे आज रविवारी सकाळी दहा वाजता सोलापूर येथे दुःखद निधन झाले. दयानंद महाविद्यालयात मराठीचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते. पू. गुरुदेव रानडे परिवारातील ते ज्ञानवंत साधक होते.
दैनिक संचार, दैनिक समाचार मध्ये तरुण वयात त्यांनी काही काळ नोकरी केली होती. संत साहित्य,संत चरित्रे ह्यावर त्यांनी विविध दैनिकातून विपुल लेखन केले आहे. अध्यात्मिक विषयांवरील त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले होते. संत साहित्य सेवा संघातर्फे त्यांचा पुरुषोत्तम सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. तसेच अन्य मानाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
क्लिक करा आणि वाचा- राज्याचे माजी मंत्री मखराम पवार यांचे मुंबईत निधन
प्रा .डॉ. नरेंद्र कुंटे सरांच्या निधनाने संत साहित्याचा एक श्रेष्ठ अभ्यासक आपण सर्वांनी गमावला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
क्लिक करा आणि वाचा- पुणेकरांनो! सोमवारपासून निर्बंध शिथिल होऊ शकतात, आजच्या बैठकीकडे लक्ष
क्लिक करा आणि वाचा- ठाण्यातील कळव्यामध्ये कोसळली दरड, ६ घरांचं मोठं नुकसान