वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
Realme C55 (किंमत १०, ९९९)
सध्या आघाडीला असणारी स्मार्टफोन कंपनी Realme चा Realme C55 स्मार्टफोन एक उत्तम बजेट फोन आहे. तब्बल 5000mAh ची मोठी बॅटरी याच आहे, ज्यामध्ये 33W SUPERVOOC चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये ६.७२ इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. फोनमध्ये MediaTek Helio G88 चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 64MP AI रियर कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय फ्रंटला 8MP कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. फोन तीन स्टोरेज पर्याय 4GB + 64GB, 6GB + 64GB आणि 8GB + 128GB मध्ये येतो. हा फोन फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवरून खरेदी करता येईल.
वाचा: Xiaomi : शाओमीचं फॅन फेस्टिवल, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काऊंट, किंमती वाचून चकित व्हाल!
Moto G32 (किंमत ९,९९९)
सर्वात जुन्या स्मार्टफोन कंपन्यापैकी एक असणाऱ्या मोटोरोला कंपनीचा
Moto G32 हा स्मार्टफोनदेखील एक कमी किंमतीत भारी फीचर्स असणारा फोन आहे. या फोनमध्ये 6.5-इंचाच्या डिस्प्लेसह 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. तसंच ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आहे. तर समोर 16MP कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे याची किंमत ९,९९९ रुपये इतकी आहे.
वाचाः एकच नंबर! ७५ इंचाच्या टीव्हीवर मिळवू शकता ६५ हजारांची सूट, काय आहे ऑफर?
Samsung Galaxy M13 5G (किंमत- ११,९९९ रुपये)
Samsung Galaxy M13 ११,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. या किंमतीत, 4 GB रॅमसह 64 GB स्टोरेज उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे. फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि 4GB RAM सह 64GB स्टोरेज पॅक करतो. फोनमध्ये Android 12 सह One UI 4 उपलब्ध आहे. फोन ड्युअल कॅमेरा सेटअप सह येतो. फोनमध्ये 50-मेगापिक्सेल प्राइमरी लेन्स आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फोनमध्ये 6000mAh बॅटरी आणि 15W चार्जिंग आहे.
वाचाः Phone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
POCO M4 5G ((किंमत – १२,४९९ रुपये)
आता तुम्ही म्हणाल या फोनची किंमत १२, ४९९ आणि मग हा १२ हजारांच्या आत कसा? पण बॅकिंग ऑफर्ससह डिस्काऊंटमुळे हा फोन १२ हजारांच्यात आत घेता येऊ शकतो. दरम्यान फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा विचार केला तर फोनमध्ये 6.58-इंचाचा Full HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90 Hz आहे. डिस्प्लेवर गोरिला ग्लास 3 चे संरक्षण देखील आहे. Poco M4 5G मध्ये 6 GB पर्यंत RAM आणि 128 GB पर्यंत स्टोरेजसह MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आहे. यासह, 2 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम देखील उपलब्ध होईल. Poco M4 5G मध्ये दोन मागील कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आहे. दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेल पोर्ट्रेट आहे. Poco M4 5G मध्ये सेल्फीसाठी 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. Poco M4 5G मध्ये 5000 mAh बॅटरी आणि 18 वॉट फास्ट चार्जिंग आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
Lava Blaze 5G (किंमत- १०,९९९ रुपये)
Lava Blaze 5G सध्या भारतातील सर्वात कमी किमतीचा 5G फोन आहे.. Lava Blaze 5G मध्ये 6.5-इंचाचा HD + IPS डिस्प्ले आणि 90Hz चा रिफ्रेश रेटआहे. फोनसोबत सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर व्यतिरिक्त, फेस अनलॉक देखील आहे. Lava Blaze 5G ला MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरीचा सपोर्ट आहे. याशिवाय, Lava Blaze 5G मध्ये तीन मागील कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आहे आणि दुसरी लेन्स AI आहे. फोनच्या फ्रंटला 8-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?