हे कॉलर आयडी फीचर दूरसंचार विभागाकडून तयार करण्यात आले आहे. सध्या, हे खास फीचर व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी आणले आहे. कॉल आयडी फीचर येत्या काही महिन्यांत सामान्य वापरकर्त्यांसाठी आणले जाऊ शकते. जर रिपोर्ट्सा विचार केला तर, गोपनीयतेच्या चिंतेमुळे हे फीचर गैर-व्यावसायिक टेलिफोन नंबरसाठी उपलब्ध केलं गेलेलं नाही. नवीन फीचरमध्ये, व्यावसायिक कॉल आल्यावर वापरकर्त्याचा कॉलर आयडी स्क्रीनवर दिसेल. याच्या मदतीने तुम्हाला व्यावसायिक आणि प्रमोशनल कॉल कोण करत आहे हे तुम्ही ओळखू शकाल.
वाचाः एकच नंबर! ७५ इंचाच्या टीव्हीवर मिळवू शकता ६५ हजारांची सूट, काय आहे ऑफर?
Truecaller अॅप सारखे काम करेल
स्पॅम कॉल्स कमी करण्यासाठी TRAI कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (CNAP) सुविधा सुरू करू शकते. सध्या, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही Truecaller अॅपवरून कॉलरच्या नावाचा पत्ता घेऊ शकता. पण त्यात अनेकजण खरं नाव टाकत नसल्याने त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. पण CNAP मध्ये ओरिजनल डॉक्यमेट अपलोड करावी लागत असल्याने याच फसवणूक होण्याची शक्यता कमी असते.
टीप – TRAI ने मागच्या वर्षी दूरसंचार विभागाला कॉलर आयडी संदर्भात एक प्रस्ताव मांडला होता. ज्यावर दूरसंचार विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. अशा स्थितीत कॉलर आयडी फीचरही सुरू करण्यात आले आहे. हे लवकरच सर्वांसाठी लागू होऊ शकते.
वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?