Makhram Pawar Passed Away: राज्याचे माजी मंत्री मखराम पवार यांचे मुंबईत निधन

हायलाइट्स:

  • गोर बंजारा समाजाचे नेते, माजी कॅबिनेट मंत्री मखराम पवार यांचे निधन.
  • मखराम पवार यांनी आज, रविवारी पहाटे लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.
  • सोमवारी सकाळी ११ वाजता मूळ गावी लोहगड, अकोला येथे होणार अंत्यसंस्कार.

मुंबई: गोर बंजारा समाजाचे नेते, माजी कॅबिनेट मंत्री मखराम पवार यांचे आज, रविवारी पहाटे लीलावती रुग्णालयात निधन झाले. चे ८२ वर्षांचे होते.सोमवारी सकाळी ११ वाजता मूळ गावी लोहगड, अकोला येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मखराम पवार यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मखराम पवार १९९० मध्ये मूर्तीजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढे ते १९९८ मध्ये विधान परिषदेवरही निवडून गेले होते. १९९८ ते २००१ या कालावधीत ते राज्याचे व्यापार आणि वाणिज्य. दारुबंदी प्रचार कार्य आणि खनिकर्म व पशूसंवर्धन खात्याचे कॅबिनेट मंत्रीही होते.

मखराम पवार हे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील भारिप-बहुजन महासंघाचे ते पहिले आमदार होते.

मखराम पवार यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी वाहिली आदरांजली

भारिप बहुजन महासंघाचे पहिले आमदार, माजी मंत्री ज्यांनी नंतरच्या कालावधीत बहुजनांची सत्ता यावी यासाठी जातीविरोधात भूमिका घेतली पाहिजे हे नुसते शाब्दिक ठेवले नाही,तर किनवटच्या निवडणुकीत आदिवासींच्या बाजूने उभे राहून आपल्याच समाजाच्या विरोधात प्रचार करून आदिवासी उमेदवार निवडून आणला,आंबेडकरी चळवळीसाठी ही नव्याने सुरूवात होती. अशा मखराम पवार यांना प्रकाश आंबेडकर यांनी आदरांजली वाहिली आहे.

Source link

makhram pawar dies at 82makhram pawar passed awayमखराम पवारमखराम पवार यांचे निधनमाजी मंत्री मखराम पवार
Comments (0)
Add Comment