फायदाच फायदा, एका प्लॅनमध्ये ४ जणांचा रिचार्ज, Netflix, Prime Video सह Hotstar ही पाहा फ्री

नवी दिल्ली : Airtel Recharge Offer:आघाडीची मोबाईल नेटवर्क कंपनी एअरटेल (Airtel) आपल्या ग्राहकांसाठी कायमच नवनवीन रिचार्ज आणि ऑफर्स घेऊन येत असते. भारतातील एक सर्वात जुनं मोबाईल नेटवर्क असणाऱ्या एअरटेलच्या अनेक प्लॅन्स मध्ये OTT प्लॅटफॉर्म जसे की Netflix, Prime Video, Disney + Hotstar यांचं मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे. दरम्यान कंपनीचे ५९९ रुपये, ९९९ रुपये, ११९९ रुपये आणि १४९९ रुपयांचे चार प्लॅन सध्या आहेत. ज्यामध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन विनामूल्य उपलब्ध आहे. दरम्यान या सर्व प्लॅनमध्ये कंपनी अॅड-ऑन फ्री कनेक्शन देखील देते, म्हणजेच एका मोठ्या मोबाईल रिचार्जमध्ये तुम्ही आणखी ओळखीच्या व्यक्तींना अॅड करुन सर्वांचा खर्च एकाच रिचार्जमध्ये भागवू शकता. तर या सर्वातील एक दमदार प्लॅन म्हटलं तर ११९९ रुपयांचा प्लॅन, त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

११९९ रुपयांचा एअरटेल प्लॅन
एअरटेलच्या या ११९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये रिचार्ज करणारा व्यक्ती आणखी तीन मोफत अॅड-ऑन व्हॉइस कनेक्शन घेऊ शकतो. म्हणजेच, जर तुमच्या कुटुंबातील इतर चार लोकांनाही तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये अॅड करु शकता. ज्यामुळे ११९९ रुपयांमध्ये तुम्ही स्वत:चा पकडून एकूण चार लोकांचा मोबाइल खर्च करू शकता. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग व्हॉईस कॉल उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १०० एसएमएस मोफत मिळतात. एअरटेलच्या या रिचार्जमध्ये प्रत्येक महिन्याला एकूण 240 GB डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये, प्राथमिक कनेक्शनसाठी 150 GB डेटा आणि प्रत्येक अॅड-ऑन कनेक्शनसाठी 30 GB डेटा दिला जातो. प्लॅनमध्ये ग्राहकांना 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हर सुविधा मिळते. प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा संपल्यानंतर, ग्राहकांना प्रति एमबी २ पैसे द्यावे लागतील.

खास OTT कनेक्शन मोफत

या प्लॅनमध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्सच बेसिक मंथली सबस्क्रिप्शन, 6 महिन्यांसाठी अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप आणि 1 वर्षासाठी डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन मोफत मिळते. याशिवाय हँडसेट प्रोटेक्शन, एक्सस्ट्रीम मोबाईल पॅक आणि विंक प्रीमियमचे सबस्क्रिप्शन देखील फ्रीमध्ये दिले जाते.

कनेक्शन वाढवण्याचीही सोय
ग्राहक या प्लॅनमध्ये ९ अॅड-ऑन कनेक्शन घेऊ शकतात आणि पेड अॅड-ऑन कनेक्शनसाठी प्रति कनेक्शन २९रुपये आकारले जातील. दरमहा अतिरिक्त ३००रुपये देऊन ते नेटफ्लिक्स स्टँडर्डवर अपग्रेड केले जाऊ शकते. तर नेटफ्लिक्स प्रीमियमसाठी दरमहा ४५० रुपये भरावे लागतील.

वाचाः Phone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

Source link

Airtelairtel mobile planairtel rechargedisney plus hotstarnetflixottprime videoअ‍ॅमेझॉनएअरटेलनेटफ्लिक्स
Comments (0)
Add Comment