Mahatma Jyotiba Phule Jayanti 2023: थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती विशेष

आधुनिक भारतातील समाज सुधारक ज्यांनी पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू केली ज्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईला शिक्षण देऊन तिला समाजामध्ये शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवले, आणि देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला, समाजाचे दगड धोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगितले, अशे थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती आहे. साताऱ्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ रोजी जोतिबा फुले यांचा जन्म झाला. ज्योतिबांनी अनेक ग्रंथांचे लिखाण सुद्धा केलेले आहे, शेतकऱ्याचा असूड, ब्राम्हणांचे कसब, अश्या अनेक प्रकारच्या ग्रंथांमधून त्यांनी समाज प्रबोधन केले होते,
“प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते.” असे म्हणणाऱ्या ज्योतीबांनी
२४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे, हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली; तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत ही चळवळ पोहोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.

महात्मा जोतिबा फुले यांचे विचार

“ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात.”

“जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका.”

“जाती आणि लिंग यांच्यावर कोणासोबत भेदभाव करणे एक प्रकारे पाप आहे.”

“भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसच आहे.”

“नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.”

असे अमेक प्रगल्भ विचार त्यांनी मांडले असून, आजही या विचारांचा सन्मान करून ते आचरणात आणल्यास अनेक गोष्टिंनी काळाबरोबर आपण परिपक्व होऊ शकतो. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी या विचारांचा नक्की फायदा होईल आणि उंच शिखर गाठणं सोपं होईल.

Source link

birth anniversaryMahatma Jyotiba Phulesavitribai phulesocial reformerआधुनिक भारतथोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुलेमहात्मा ज्योतीबा फुलेमहात्मा ज्योतीबा फुले जयंतीवाढदिवससावित्रीबाई फुले
Comments (0)
Add Comment