relaxation in restriction in pune: पुणेकरांसाठी मोठी घोषणा; निर्बंधात मोठी शिथिलता, हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा

हायलाइट्स:

  • पुणे आणि पिपंरी-चिंचवड शहरात सोमवार ते शुक्रवार रात्री सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहणार.
  • पुण्यातील सर्व हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार.
  • पुण्यातील मॉल्स रात्री ८ वाजेपर्यंत सुरू, दोन लशी घेणाऱ्यांना प्रवेश.


पुणे: पुण्यातील निर्बंधात शिथिलता देण्याबाबत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. पालकमंत्री पवार यांनी घेतलेल्या बैठकीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील करोना निर्बंधात शिथिलता देण्याबाबतचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार पुणे आणि पिपंरी-चिंचवड शहरात सोमवार ते शुक्रवार रात्री सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहणार असून पुण्यातील सर्व हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मॉल्स रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र, दोन्ही लशी घेणाऱ्यांनाच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. (relaxation in corona restrictions in pune big relief for hotels malls and shops in pune and pimpri chinchwad)

रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा कडक नियम- अजित पवार

हा निर्णय घेण्यात येत असला तरी पुण्याचा पॉझिटीव्हीटीचा दर जर ७ टक्क्यांहून अधिक झाला, तर ही मुभा पुन्हा बद करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पुणेकरांनी मास्कचा वापर केलाच पाहिजे. सर्व नियम पाळलेच पाहिजे. दुकानांचे मालक आणि सेल्समन हे बऱ्याचदा मास्क वापरत नाही ही तक्रार आहे. मात्र नियमांमध्ये शिथिलता हवी असेल तर खबरदारी घेतली पाहिजे ही मी नम्र विनंती करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज जनतेशी संवाद; लोकल आणि हॉटेलच्या वेळांवर बोलणार?

ग्रामिण भागात १३ तालुक्यांमध्ये लेवल ३ ची नियमावली सोमवारपासून लागू करण्यात आली आहे. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराप्रमाणे ग्रामीणलाही सूट द्या अशी मागणई होती. मात्र पॉझटीव्हीटीता दर सरासरी ५ असल्याने तसा निर्णय घेता येत नसल्याचे ते म्हणाले.

मंदिरे, धार्मिक स्थळेमात्र बंदच राहणार

दरम्यान,पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना करोनाच्या निर्बंधात शिथिलता देण्यात आली असली तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मंदिरे आणि धार्मिक स्थळांना मात्र कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांप्रमाणेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये देखील मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंदच राहतील असे अजित पवार म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- राज्याचे माजी मंत्री मखराम पवार यांचे मुंबईत निधन

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये काय आहेत नवे नियम?

> पुण्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार.
> पुण्यातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील.
> हॉटेल चालकांना करोना लशीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक.
> पु्णे आणि पिंपरी चिंचवडमधील मॉल्स रात्री ८ पर्यंत सुरू राहणार.
> लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश.
> उद्याने नियमित वेळेनुसार सुरू राहणार.
> जलतरण तलाव वगळता इतर सर्व खेळांना परवानगी.

क्लिक करा आणि वाचा- संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे यांचे निधन

Source link

ajit pawarbig relief for hotelsPimpri Chinchwadrelaxation for malls and shops in punerelaxation in corona restrictions in pune
Comments (0)
Add Comment