तर एलॉन मस्क यांनी ट्विट केलं आहे की ब्लू टिक काढण्याची अंतिम तारीख 4/20 आहे. दरम्यान याचा अर्थ २० एप्रिल आहे की आणखी काही हे अद्यापतरी स्पष्ट नाही. दरम्यान मस्क यांचा स्वभाव मिश्किल असल्याने नेमका याचा अर्थ काय हे आतातरी सांगता येणार नाही. तर Twitter Blue च्या सबस्क्रिप्शनसाठी, दरमहा ६५० रुपये आकारले जाणार असून वार्षिक योजना ६,८०० रुपये प्रति वर्ष आहे.
२० एप्रिल अंतिम तारीख?
तर ट्विटरवरील ब्लू टिक काढून टाकण्यासाठी ट्विटरने आधी १ एप्रिलची अंतिम मुदत जाहीर केली होती. मात्र, आता मस्क यांनी ट्वीट करून 4/20 ही अंतिम तारीख दिली आहे. मस्कने २० एप्रिलचा दिवस निवडला आहे की हा एक विनोद आहे. ते देखील स्पष्ट नाही. खरं तर, अमेरिकेत, जिथे गांज्यासारख्या गोष्टी कायदेशीर आहेत, तिथे 20 एप्रिल रोजी गांजा दिवस साजरा केला जातो.
याआधीही ४२० या आकड्याने मस्क अडकले होते अडचणीत
४२० या आकड्यामुळे इलॉन मस्क याआधीही अडकले होते. 2018 मध्ये मस्कने टेस्लाला $420 प्रति शेअर दराने खाजगी कंपनी बनवण्याची घोषणा केली होती. मात्र, तसे करता आले नाही. त्यामुळे त्यांना गुंतवणूकदारांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. त्याचवेळी खोटे ट्विट केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
वाचाः Window AC ला बाहेरच्या बाजुने का लावतात, कधी विचार केलाय?, जाणून घ्या नेमकं कारण