या कंपनीने लाँच केला कमी किंमतीचा प्लान, ३० दिवसाची वैधता, रोज १ जीबी डेटा

नवी दिल्लीः भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ सारख्या टेलिकॉम कंपन्यांनी देशात आपली ५जी सर्विसचा विस्तार केला आहे. प्रतिस्पर्धी कंपनी वोडाफोन आयडिया म्हणजेच व्हीने ४ ला मजबूक करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या यादीत आता कंपनीने स्वस्त ४जी डेटा प्लान आणला आहे. या प्लान सोबत यूजर्सला महिनाभर चिंता करण्याची गरज नाही. कंपनीने १८१ रुपयाचा नवीन प्रीपेड प्लान आणला आहे. जाणून घ्या वोडाफोन आयडियाच्या या प्लान संबंधी.

Vi चा १८१ रुपयाचा प्लान
वोडाफोन आयडियाचा नवीन प्लान १८१ रुपयाच्या किंमतीत येतो. या प्लानमध्ये ३० दिवसाची वैधते सोबत येतो. या प्लानला रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना ३० दिवसासाठी रोज १ जीबी डेटा मिळतो. एकूण काय तर हा डेटा प्लान एक महिन्यासाठी असून यात ३० जीबी डेटा मिळतो. १ जीबी डेटा रोजचा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा १ जीबी डेटा मिळतो.

याशिवाय, या प्लानमध्ये कोणतीही एसएमएस सुविधा किंवा व्हाइस कॉलिंगचा लाभ मिळत नाही. म्हणजेच या प्लानचा वापर प्राथमिक पॅक सोबत अॅड ऑन पॅकच्या रुपात केला जावू शकतो. वोडाफोन आयडियाचा नवीन १८१ रुपयाचा प्लान सोबत ४जी डेटाची सुविधा मिळते. हा प्लान त्या लोकांसाठी चांगला ऑप्शन आहे. ज्यांना प्रायमरी प्लान सोबत डेली डेटाची कमी जाणवते. ज्यांना दिवसभर जास्त डेटा लागतो.

वाचाः Tecno चा फोल्डेबल फोन Phantom V Fold 5G भारतात लाँच, आज फोनचा सेल, स्वस्तात मिळणार

हे ऑप्शनही पाहा
कंपनीने नुकतेच आणखी दोन नवीन प्लान लाँच केले आहेत. या प्लानची किंमत २८९ रुपये आणि ४२९ रुपये किंमतीचे प्लान आहेत. २८९ रुपयाचा प्रीपेड वोडाफोन आयडियाचा प्लान ४८ दिवसाच्या वैधते सोबत येतो. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि ६०० एसएमएस सोबत एकूण ४ जीबी डेटा दिला जातो. तर ४२९ रुपयाचा प्लान ७८ दिवसाच्या वैधते सोबत येतो. या प्लान सोबत ६ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा मिळते.

वाचाः Twitter Blue Tick : ‘या’ दिवसापासून हटवले जाणार सर्व जुने ब्लू टिक, इलॉन मस्कचं ट्वीट पाहिलं का?

Source link

Vi Planvodafone idea planvodafone idea plan detailsVodafone Idea Plan under 200Vodafone Idea plansवोडाफोन आयडिया प्लान
Comments (0)
Add Comment