UIDAI आणि IIT मुंबई देणार खास गिफ्ट, फोनमधूनच होणार फिंगरप्रिंट टेस्ट

नवी दिल्ली :UIDAI Partners with IIT Bombay : सध्या मोबाईलमधून फेस ऑथेंटिकेशन करता येतं पण फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनसाठी आपल्याला जवळच्या सायबर कॅफे किंवा ई-सेवा केंद्रात जावं लागतं. पण आता टचलेस बायोमेट्रिक कॅप्चर सिस्टीम घरूनच फिंगरप्रिंट प्रमाणीकरण म्हणजेच ऑथेंटिकेशन करुन देऊ शकते. यासाठी भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) ने भारतीय तंत्रज्ञान संस्था-बॉम्बे (IIT-Bombay) सोबत पार्टनरशिप केली आहे, ज्यामुळे कधीही आणि कुठेही सुलभ वापरासाठी एक मजबूत टचलेस बायोमेट्रिक कॅप्चर प्रणाली (Biometric Fingerprint Authentication) विकसित केली जात आहे.ट

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. तर आता UIDAI आणि IIT बॉम्बे फिंगरप्रिंट्स ऑथेंटिकेशनसाठी मोबाईल कॅप्चर सिस्टीम आणि कॅप्चर सिस्टमसह एकत्रित केलेलं खास मॉडेल तयार करत हे संयुक्त संशोधन करत आहेत. त्यामुळे एकदा का ही टचलेस बायोमेट्रिक कॅप्चर सिस्टीम प्रणाली विकसित आणि कार्यान्वित झाली तर फेस ऑथेंटिकेशनप्रमाणे घरूनच फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन करता येणार आहे. विशेष म्हणजे नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन टेक्नॉलॉजी फॉर इंटरनल सिक्युरिटी (NCETIS) द्वारे UIDAI आणि IIT बॉम्बे हे या सिस्टमवर काम करत आहेत. या प्रणालीच्या संशोधन आणि विकासासाठी आयआयटी बॉम्बेमधील दिग्गज इंजीनियर काम करत आहेत.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

कोणता फोन असणार Compatible?
विशेष म्हणजे सध्या काम सुरु असलेली ही नवीन सिस्टीम एकाच वेळी अनेक फिंगरप्रिंट्स कॅप्चर करेल आणि ऑथेंटिकेशन यशस्वी होण्यास मदत करेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. नवीन प्रणाली एकदा अस्तित्वात आल्यावर आधार इकोसिस्टममध्ये उपलब्ध असलेल्या आताच्या सोयींमध्ये आणखी सुलभता येईल. अशा प्रणालीमध्ये सिग्नल किंवा इमेज प्रोसेसिंग आणि मशीन लर्निंग किंवा डीप लर्निंगवर अधिककाम केलं जणार आहे. ज्यामुळे नॉर्मल फोनमधूनही वापरकर्ता हे फिंगरप्रिंट स्कॅनिंग करु शकतो.

वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

Source link

biometric authenticationbiometric fingerprint authenticationiit bombayuidaiआधार कार्डआयआयटी बॉम्बेफिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन
Comments (0)
Add Comment