राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) विविध प्रकारच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जात आहेत. या १७ अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी राज्यभरातील ११ लाख ८८ हजार १२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर ९ लाख ८२ हजार ९२० विद्यार्थ्यांना फी भरून अर्ज निश्चित केला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ‘सीईटी’ सेलमार्फत प्रवेश गेल्या महिन्यापासून प्रवेश परीक्षा सुरू असून, यापैकी काही परीक्षा झाल्या आहेत. तसेच काही परीक्षा येणाऱ्या महिनाभरात होणार आहेत. या सर्व परीक्षांसाठी फेब्रुवारी महिन्यापासून विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. १७ अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी राज्यातील ११ लाख ८८ हजार १२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी ९ लाख ८२ हजार ९२० विद्यार्थ्यांनी फी भरून अर्जनिश्चिती केली आहे. यापैकी १२ अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया संपली आहे, तर ५ अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्यामुळे या नोंदणीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
अभ्यासक्रम नोंदणी केलेले विद्यार्थी अर्ज निश्चित झालेले विद्यार्थी
एमएचटी सीईटी ७,३९,७७८ ६,१९,६७३
एमबीए/एमएमएस १,५०,७०७ १,३१,०३५
एमसीए ३९,२१९ ३४,२४६
बी. एचएमसीटी १,२०७ ९३६
बी. प्लॅनिंग ११९ ७३
बी. डिझाईन ९५३ ६३०
एम. एचएमसीटी ३७ १३
एम. आर्क ३६४ २३१
फाईन आर्ट ४,५६१ ३,४६०
बीए-बीएस्सी बीएड ४,६३३ १,४११
लॉ (५ वर्षे) २८,२५८ २२,५२६
लॉ (३ वर्षे) ८९,२९३ ७२,९२५
बी. पीएड ११,२५० ९,३९९
बीएड व बीएड इलेक्टिव १,०२,३२६ ७९,९८४
बीएड-एमएड ९,४८३ १,७९६
एमएड ३,४४७ २,४९४
एमपीएड २,४९२ २,०८८
एकूण ११,८८,१२७ ९,८२,९२०