16GB रॅम
कोणताही स्मार्टफोन असेल तर त्याचा परफॉर्मन्स हा त्याच्या प्रोसेसर आणि रॅमवर अवलंबून असतो. त्यात 16GB हा लेटेस्ट रॅम फायदा देणारा असला तरी सामन्य 12GB रॅमप्रमाणेच हा देखील काम करतो तसंच बऱ्याच हायग्राफिक गेमिंग तसंच इतर कार्यांसाठी 12GB रॅम पुरेसा असल्याने 16GB रॅम एक अधिक काम नसणारं असं फीचर आहे.
वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
हाय रिफ्रेश रेट
यातील एक महत्त्वाचं फीचर म्हणाल तर अधिकचा रिफ्रेश रेट. कोणत्याही फोनमध्ये जितका हर्ट्स जास्त रिफ्रेश रेट असतो तितकीच त्याची स्क्रिन अधि फास्ट रिफ्रेश होताना दिसते. एकंदरीत काय तर एक स्मूद अनुभव वापरणाऱ्याला येतो. पण तसं पाहायला गेलं तर हा फीचर अगदी जास्त वापराचा नाही. याउलट याचा तोटा थेट फोनच्या बॅटरी होतो. आधीच फोनच्या रिफ्रेश रेटमुळे किंमतीवर परिणाम होतोच. तसंत जास्त रिफ्रेश रेटमुळे बॅटरीचा वापर वाढतो आणि त्यामुळे बॅटरी ड्रेन होण्याची शक्यताही वाढते.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
8K व्हिडीओ रेकॉर्डिंग
अगदी अफलातून क्लिएरिटीसाठी 8K व्हिडीओ रेकॉर्डिंग वापरली जाते. पण या हाय अँड प्रीमियम स्मार्टफोनची किंमत या 8K रेकॉर्डिंगमुळे अधिक वाढते. शिवाय अधिकतर स्क्रिन्सवर 8K रेकॉर्डिंग सपोर्ट करत नाही, त्यामुळे हे फीचरही काही खास कामाचं नाही. तसंच 8K मधील व्हिडीओही खूप जास्त स्टोरेज खात असल्यानेफोनही स्लो होऊ शकतात.
वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
१०८ मेगापिक्सलचा कॅमेरा
जेव्हा मार्केटमध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा आला तेव्हा त्या फोन्सची मोठी हवा झाली होती. फारच भारी फोटो आणि व्हिडीओ येतील असं म्हटलं जात होतं. पण तसं काहीच झालं नाही. इतर फोन्सप्रमाणे फोटो या १०८ मेगापिक्सलमधूनही येतात. त्यामुळे १० ते २० हजाराच्या किंमतीतील बजेट फोन्समध्येही असे कॅमेरे येऊ लागले. याउलट ५० मेगापिक्सल कॅमेरा असणारे फोन्सही भारी फोटो देत असल्याचं दिसून आलं. तसंच १०८ एमपी फोटो काढल्यावर त्यासाठी स्टोरेजही अधिकचं वापरलं जातं.
वाचाःWindow AC ला बाहेरच्या बाजुने का लावतात, कधी विचार केलाय?, जाणून घ्या नेमकं कारण
वायरलेस चार्जिंग
फोनला वायर न लावता केवळ एका विशिष्ट अशा व्हायरलेस चार्जवर फोन ठेवून चार्ज केला जाऊ शकतो. याच व्हायरेलस चार्जरला आल्या आल्या मार्केटमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.पण मूळात हे फीचर तितक फायदेशीर नसल्यानं हे एख मूलभत फीचर नाही. त्यात हे चार्जर वापरताना फोनच्या बॅटरीलाही धोकाच असतो. बॅटरी लवकर चार्जच होत नाही. तसंच चार्ज झालेली बॅटरही लवकर खराब होते.
वाचाःJio ची भन्नाट ऑफर, ९१ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत OTT आणि बरच काही…