नवी दिल्ली:OpenAI Bug Bounty Program : चॅट जीपीटी (Chatgpt) म्हणजे काय तर कोणत्याही प्रकारची माहिती आपल्याला या साईटवर एका क्लिकवर मिळू शकते. आपले कितीतरी ऑनालाईन टास्कही हे Chatgpt करु शकतं. वैज्ञानिक शब्दात Chatgpt ला एक कृत्रिम बुद्धिमत्ता साधन म्हणू शकतो. तरुण आणि तांत्रिक क्षेत्रातील जाणकार आजकाल सोशल साईट्सवर यावर सतत चर्चा करताना दिसत आहे. दरम्यान Chatgpt बनवणाऱ्या कंपनीने आता एक खास OpenAI Bug Bounty प्रोग्राम आणला आहे. ज्याअंतर्गत तुम्हाला लाखो रुपये जिंकण्याची संधी आहे. आतापर्यंत आपण ChatGPT चे अनेक फायदे पाहिले आहेत. पण त्यातील त्रुटी सांगितल्यास कंपनीच बक्षीस देणार आहे.तर हे चॅटबॉट ChatGPT अमेरिकन रिसर्च फर्म OpenAI ने गेल्या वर्षी हे लॉन्च केले होते. तेव्हापासून लोकांमध्ये त्याची क्रेझ वाढत आहे. आत्तापर्यंत आपण ChatGPT च्या अनेक वैशिष्ट्यांबद्दल बोललो आहोत. हे तंत्रज्ञान लोकांच्या प्रश्नांची उत्तरे सहज देते. पण आता या ChatGPT मधील गुणवत्तेऐवजी त्यातील त्रुटी सांगितल्यास लाखांचे बक्षीस मिळेल. तर ChatGPT डेव्हलपर कंपनी OpenAI एक प्रोग्राम चालवत आहे. OpenAI बग बाउंटी प्रोग्राममध्ये, जे लोक कंपनीच्या या प्रणालीतील त्रुटी दाखवतात त्यांना पुरस्कृत केले जाईल. ChatGPT सारख्या कंपनीच्या उत्पादनांमध्ये कोणाला दोष आढळल्यास, त्याला बक्षीस दिले जाईल. कंपनीने प्रत्येक त्रुटी म्हणजेच बगसाठी २०० डॉलर्स (सुमारे १६,४०० रुपये) देण्याची घोषणा केली आहे.
16 लाख जिंकण्याची संधी
जेव्हा इटलीने डेटा प्रायव्हसीबाबत ChatGPT वर बंदी घातली असताना
कंपनीने ही ऑफर आणली आहे. इतर युरोपीय देश देखील जनरेटिव्ह एआय सेवांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे कंपनी आपल्या या तंत्रज्ञानाला आणखी भारी करण्याकरता त्यातील त्रुटी शोधून त्याठिक करण्याच्या दृष्टीने काम करणार आहे. विशेष म्हणजे या OpenAI च्या प्रोग्राममध्ये २०,००० डॉलर्स (सुमारे १६.४ लाख भारतीय रुपये) पर्यंतची रक्कम जिंकली जाऊ शकते.
वाचा:Twitter Blue Tick : ‘या’ दिवसापासून हटवले जाणार सर्व जुने ब्लू टिक, एलन मस्कचं ट्वीट पाहिलं का?