ट्रेंट बोल्ट हा दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.” बोल्ट यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात होता. बोल्टने राजस्थानकडून खेळताना दमदार कामगिरी केली होती आणि तो त्यांच्यासाठी मॅचविनर ठरत होता. पण या सामन्यात मात्र तो खेळणार नाही.
सध्या फॉर्मात असलेले जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल या राजस्थानच्या सलामीच्या जोडीची आज, बुधवारी आयपीएल टी-२० क्रिकेट सामन्यात कसोटी लागणार आहे. राजस्थानचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. चेपॉकच्या एम. चिन्नास्वामीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना पोषक असून, त्यावर यशस्वी ठरतील, असे टी-२० क्रिकेटला साजेसे दर्जेदार फिरकी गोलंदाज चेन्नईच्या संघात आहेत. यामुळे चेन्नईचे फिरकी गोलंदाज विरुद्ध राजस्थानचे फलंदाज अशी लढत बघायला मिळण्याची शक्यता आहे.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडचे नेतृत्व करणारा बटलर आणि त्याचा तरुण भारतीय जोडीदार जयस्वाल यांनी अनुक्रमे १८०.९५ आणि १६४.४७च्या स्टाइक रेटने अर्धशतके केली आहेत. मात्र, राजस्थान आपल्या तीनपैकी दोन लढतींत पाटा खेळपट्टी असलेल्या गुवाहाटीत खेळला आहे, तर हैदराबादमधील लढतदेखील फलंदाजांच्या प्रेमात असलेल्या खेळपट्टीवर झाली आहे. मात्र, आता हा संघ चेन्नईत खेळणार आहे. जिथे फिरकी गोलंदाजांना चेंडूवर सहज पकड मिळवता येते; तसेच सामना पुढे सरकला, की खेळपट्टी संथही होते. अशा परिस्थितीत आव्हान १७० किंवा त्याच्या पलीकडे असेल, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघासाठी पुढील गोष्टी कठीण होतात. चेपॉकवर मोइन अली, रवींद्र जडेजा आणि मिचेल सँटनर मिळून १० किंवा १२ षटके मारा करतात. या तिघांनी गेल्या तीन सामन्यांत मिळून ११ मोहरे टिपले आहेत.
फिरकी गोलंदाजांचा वरचष्मा असेल, तर राजस्थान फिरकी गोलंदाजांनाही कमी लेखून चालणार नाही. सध्या राजस्थानच्या सेवेत असणारा आर. अश्विन कारकिर्दीतील बरेचसे क्रिकेट ‘चेपॉक’च्या खेळपट्टीवर खेळला आहे. यझुवेंद्र चहल आणि तमिळनाडूचा फिरकी गोलंदाज मुरुगन अश्विनही राजस्थानच्या संघात आहे.
पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस
खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने गोलंदाजीचा विषय अधिक चर्चेत आहे; पण प्रतिस्पर्धी संघांकडे फलंदाजीचे चांगले पर्याय उपलब्ध आहेत.