CWG 2022: राष्ट्रकुल झाल्यानंतर आली धक्कादायक बातमी; दोन खेळाडू झाले बेपत्ता

Pakistan At CWG 2022-राष्ट्रकुल स्पर्धा २०२२मध्ये सर्वच खेळाडूंनी आपला उत्कृष्ट खेळ दाखवत आणि पदकांची लयलूट केली आहे. ८ ऑगस्ट रोजी या राष्ट्रकुल स्पर्धांचा समारोप झाला आहे. या खेळांच्या समाप्तीनंतर बर्मिंगहॅमला स्पर्धेसाठी गेलेले पाकिस्तानचे दोन बॉक्सर बेपत्ता झाल्याची माहिती दिली जात आहे. राष्ट्रीय महासंघाने बुधवारी ही माहिती दिली. पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनचे (पीबीएफ) सचिव नासेर तांग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला की बॉक्सर सुलेमान बलोच आणि नझिरुल्ला हे इस्लामाबादला रवाना होण्यापूर्वी काही तास आधी बेपत्ता झाले होते.

तांग म्हणाले की, “त्यांच्या पासपोर्टसह प्रवासाची कागदपत्रे अद्यापही महासंघाच्या अधिकार्‍यांकडे आहेत जे बॉक्सिंग संघासोबत खेळासाठी गेले होते.” ते म्हणाले की, संघ व्यवस्थापनाने यूकेमधील पाकिस्तान उच्चायुक्तांना आणि लंडनमधील संबंधित अधिकाऱ्यांना सुलेमान आणि नझिरुल्ला बेपत्ता झाल्याची माहिती दिली आहे. बेपत्ता बॉक्सर्सची कागदपत्रे पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी मानक कार्यप्रणालीनुसार (एसओपी) ठेवण्यात आली असल्याचे तांग यांनी सांगितले.

इतका मोठा धोका तोही थेट पाकिस्तानविरुद्ध; भारतीय संघाने आशिया कपसाठी पाहा काय केले

पाकिस्तान ऑलिम्पिक असोसिएशनने (POA) हरवलेल्या बॉक्सरच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या बॉक्सिंग स्पर्धेत पाकिस्तानला एकही पदक जिंकता आले नाही. वेटलिफ्टिंग आणि भालाफेकमधील दोन सुवर्णांसह या खेळांमध्ये देशाने आठ पदके जिंकली.

फुटबॉल विश्वचषकाच्या वेळापत्रकात मोठा बदल, पाहा पहिला सामना कधी सुरु होऊ शकतो

राष्ट्रीय जलतरणपटू फैजान अकबर हंगेरीतील फिना वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बेपत्ता झाल्याच्या दोन महिन्यांनंतर बॉक्सर हरवल्याची घटना घडली आहे. अकबर मात्र चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होताना दिसला नाही आणि बुडापेस्टमध्ये आल्यानंतर काही तासांनी तो त्याच्या पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांसह गायब झाला. जूनपासून त्याचा शोध लागलेला नाही.

Source link

pakistan at commonwealth gamespakistan boxingpakistan high commissionpakistan olympic associationpakistani boxers missing after commonwealth gamespakistani boxers missing in birminghamSuleman Balochपाकिस्तानी बॉक्सरराष्ट्रकुल स्पर्धा २०२२
Comments (0)
Add Comment