तुमच्या घराचा नेमका वीजेचा वापर किती?
तर सर्वात आधी नवीन इन्व्हर्टर खरेदी करताना विचारात घेण्याची पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या घरासाठी नेमकी किती वीज लागते. म्हणजेच तुम्हाला रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर अशी हेवी उपकरणं चालवायची आहेत की फक्त लाईट आणि पंख्यांसारखी कमी पॉवरवर चालणारी उपकरणं चालवायची आहेत? ही महत्त्वाची गोष्ट आहे. याचाच सोप्या शब्दात अर्थ म्हणजे तुम्हाला किती पॉवरची किती उपकरणं चालवायची आहेत, ते जाणून घ्या. उदाहरणार्थ समजा तुम्ही दोन ट्यूब लाईट (60 W), 1 पंखा (70 W) आणि 2 छोटे बल्ब (40 W) या इन्व्हर्टरवर चालवणार असाल तर तुम्हाला एकूण 60 + 70 + 40 = 170 W इतकी लाईट लागणार आहे. त्या नुसारच तुम्ही इन्व्हर्टर खरेदी करु शकता.
तुम्हाला इन्व्हर्टरचा नेमका प्रकार कोणता हवा आहे?
बहुतेक इन्व्हर्टर सारखे दिसतात पण तरी त्यांच्यात बराच फरक असतो. त्यांची पॉवर देण्याची क्षमता सर्वात मोठा फरक असतो. काही इन्व्हर्टर प्युअर साइन वेव्ह असतात तर काही स्क्वेअर वेव्ह आहेत. प्युअर साइन वेव्ह इनव्हर्टरचा फायदा म्हणजे इलेक्ट्रीसिटी गेल्यावर कॉम्प्युटर, मॉडेम, राउटर यासारखी उपकरणं यामध्ये सुरळीतपणे सुरु राहण्यासाठी याचा अधिक फायदा होतो. स्क्वेअर वेव्ह इन्व्हर्टरच्या तुलनेत प्युअर साइन वेव्ह इनव्हर्टर किंचित महाग असतात.
वाचाःWindow AC ला बाहेरच्या बाजुने का लावतात, कधी विचार केलाय?, जाणून घ्या नेमकं कारण
तुमच्यासाठी योग्य क्षमतेचा इन्व्हर्टर कोणता?
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी योग्य क्षमता असणारा इन्व्हर्टर कोणता? आता इन्व्हर्टरची क्षमता व्होल्ट अँपिअर (VA) रेटिंगमध्ये मोजली जाते. याचा अर्थ वीज गेल्यावर इन्व्हर्टरद्वारे उपकरणांना दिल्या जाणाऱ्या करंटचा व्होल्टेज आणि अँपिअर किती असते. दरम्यान याचं मोजमापन पॉवर रिक्वायरमेंट/पॉवर फॅक्टर म्हणून केलं जाते. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार त्या क्षमतेचा इन्व्हर्टर तुम्ही घेऊ शकता.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
इन्व्हर्टरसाठी योग्य बॅटरी निवडणं महत्त्वाचं
बॅटरी हा इन्व्हर्टर सेटअपचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. योग्य बॅटरी मिळवणं महत्वाचं आहे कारण ते इन्व्हर्टरची पॉवर आणि लाईफ निर्धारित करतात. बॅटरीची क्षमता अँपिअर अवर्स (Ah) मध्ये मोजली जाते. तुम्हाला किती वेळासाठी बॅकअप घ्यायचा आहे यावर देखील हे अवलंबून असते. उदाहरणार्थ, तुम्हाला 2 तासांपेक्षा जास्त बॅटरी लाइफ हवी आहे, तर जास्त क्षमतेची बॅटरी वापरणे योग्य आहे.
वाचाःJio ची भन्नाट ऑफर, ९१ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत OTT आणि बरच काही…
व्होल्टेज रेग्युलेटर
इन्व्हर्टरमध्ये व्होल्टेज रेग्युलेटर असणं आवश्यक फीचर आहे. अस्थिर व्होल्टेज आउटपुटमुळे कनेक्ट केलेल्या उपकरणांना नुकसान होऊ शकते. तुमच्या उपकरणांचे संरक्षण करण्यासाठी चांगले व्होल्टेज नियमन म्हणजेच व्होल्टेज रेग्युलेटर असलेला इन्व्हर्टर घ्यावा. तसंच ओव्हरलोड संरक्षण हे इन्व्हर्टरसाठी अनिवार्य आणि आवश्यक सुरक्षा फीचर आहे. हे इन्व्हर्टरला जास्त गरम होण्यापासून प्रतिबंधित करतं आणि उपकरणं खराब होण्यापासून देखील वाचवतं.
इन्व्हर्टर ट्रॉली घ्या
इन्व्हर्टर विकत घेताना इन्व्हर्टर ट्रॉली ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. विशेषतः जर तुम्ही घरात इन्व्हर्टर ठेवण्याचा विचार करत असाल. अशाप्रकारची इन्व्हर्टर ट्रॉली तुमच्या घराची शोभा वाढवू शकते. याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्व्हर्टरच्या सेफटीच्या दृष्टीने देखील ही इन्व्हर्टर ट्रॉली महत्त्वाची आहे.
वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
ब्रँडेड इनव्हर्टरच घ्या
आजकाल इन्व्हर्टरची बऱ्याच कंपन्या विक्री करत आहेत. मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत.पण तरी देखील विश्वासार्ह ब्रँडमधून एक निवडा कारण विक्रीनंतरची सेवाही महत्त्वाची आहे, जी ब्रँडेड कंपनीच देते. तसंच नवीन इन्व्हर्टर आणि बॅटरी खरेदी करताना, वॉरंटी माहितीबद्दल सर्व काही योग्यप्रमाणे तपासून घ्या. तुम्ही विकत घेणाऱ्या दुकानदाराला वॉरंटी कार्डवर वॉरंटीबाबतची सर्व माहिती योग्यप्रकारे टाकण्यास सांगा.
वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन