Aadhar Card Loan: आता लोन घेण्यासाठी बँकांच्या मागे धावावे लागणार नाही, फक्त २ मिनिटात मिळेल लोन

नवी दिल्लीःआधार कार्ड हे डॉक्यूमेंट आता अनेक कामांसाठी आवश्यक झाले आहे. प्रवासात असो की, सरकारी किंवा खासगी कामांसाठी आधार कार्डची आवश्यकता प्रत्येक ठिकाणी आहे. आधार कार्ड शिवाय तुमची अनेक कामं खोळंबली जाऊ शकतात. तुम्हाला पर्सनल लोन मिळवण्यासाठी पत्ता आणि आयडेंटिटी पुरावा द्यावा लागतो. परंतु, आता आधार कार्ड द्वारे तुम्हाला पर्सनल लोन मिळू शकते. आता बँक आधार कार्डचा वापर करून ई-केवायसी करू शकता. याची पद्धत खूपच सोपी आहे. जाणून घ्या यासंबंधीची सविस्तर माहिती.

या बँका देणार लोन
आपल्या आधार कार्डच्या मदतीने पर्सनल लोन साठी अप्लाय करू शकता. भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी बँक आणि कोटक बँक सारख्या भारतातील अनेक बँका आपल्या ग्राहकांना आधार द्वारे लोन देऊ शकतात. तुमचे क्रेडिट स्कोर ७५० किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आधार कार्ड द्वारे तुम्हाला २ लाख रुपयांपर्यंत लोन मिळू शकते. अनेकदा अॅप्लिकेशनचे अप्रूव्हसाठी ५ मिनिट लागतात. त्यानंतर तात्काळ डिसबर्सल सुद्धा होते.

वाचा:Twitter Blue Tick : ‘या’ दिवसापासून हटवले जाणार सर्व जुने ब्लू टिक, एलन मस्कचं ट्वीट पाहिलं का?

आधार कार्ड वरून पर्सनल लोनसाठी असा करा अप्लाय

  • आपल्या आधार कार्डचा वापर करून लोनसाठी अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • तुम्ही बँकेच्या मोबाइल अॅपचा वापरू करूनही पर्सनल लोनसाठी अप्लाय करू शकता.
  • यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. हा ओटीपी भरा.
  • नंतर तुम्हाला पर्सनल लोनचा ऑप्शन निवडावा लागेल.
  • लोन रक्कम आणि बाकीच्या आवश्यक गोष्टीची माहिती भरावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला पॅन कार्ड डिटेल्सची मागितली जाईल. ही माहिती योग्य भरा.
  • सरकारी बँकांद्वारा क्रॉस चेक केले जाईल. असे केल्यानंतर तुमचे लोन मंजूर केले जाईल.
  • तसेच लोनची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

वाचाःसरकारचा मोठा निर्णय! Mobile फोनमध्ये इमर्जन्सी अलर्ट अनिवार्य, अन्यथा ६ महिन्यांत फोन होणार बंदवाचाःWindow AC ला बाहेरच्या बाजुने का लावतात, कधी विचार केलाय?, जाणून घ्या नेमकं कारण

Source link

aadhar cardAadhar Card LoanAadhar Card Loan processआधार कार्डआधार कार्ड लोन
Comments (0)
Add Comment