नवी दिल्ली :Vi to launch 5G network soon: आता 4G हळूहळू सर्वच मोबाईल नेटवर्क 5G च्या दिशेने जात आहेत. कमालीचं स्पीड असणाऱ्या 5G नेटवर्कची सुरुवात भारतात जिओ, एअरटेल यांनी केली असून आता आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी वोडोफोन आयडियाही (Vi) 5G सेवा देण्यास सुरुवात करणार आहे. सध्या Vi कंपनी ही 5G सेवा सुरु करण्यासाठी मोटोरोला, शाओमी या कंपन्यांसोबत हातमिळवणी करत आहे.सध्या Vi देशभरात 2G, 3G आणि 4G सेवा प्रदान करत आहे.दरम्यान कंपनीने मागील तीन महिन्यात १.३ मिलियन (१३.६ लाख) ग्राहकांना गमावलं आहे, इतक्या व्यक्तींनी वोडाफोनचं नेटवर्क वापरणं बंद केलं असून सलग २२ वा महिना आहे ज्यात कंपनीचे ग्राहक कमी होत आहेत. दरम्यान यामुळेच आता आपली सेवा आणखी सुधारण्याकरता कंपनी काम करत असून यासाठी 5G सेवा घेऊन येत आहे. एका वृत्त्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार कंपनीचे ग्रुप चेअरपर्सन कुमार मंगलम यांच्या मते कंपनी लवकरच देशात 5G सेवा सुरु करणार आहे. पहिल्यांदाच कंपनीने अधिकृतरित्या असं विधान केलं आहे. पण हे कधी होणार याबाबत नेमकी तारीख सांगितली गेलेली नाही.
वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
रिलायन्स जिओ आणि एअरटेलचं 5G नेटवर्क जोमात
सध्या जिओ, एअरटेल आपली 5G सेवा देशभरात विस्तारत आहेत.जिओने आतापर्यंत २,३४५ शहरांमध्ये, ३४ राज्यांमध्ये 5G सेवा सुरु केली आहे. दुसरीकडे एअरटेल कंपनी देखील सध्या ५०० हून अधिक शहरात 5G सेवा देत आहे. नुकताच त्यांनी बुधवारी (१२ एप्रिल) लदाखसारख्या उंच ठिकाणीही 5G सेवा सुरु केली. सर्वच ग्राहक या 5G सेवांचा उपभोग घेऊ शकणार असून 4G च्या तुलनेत २० ते ३० टक्के अधिक फास्ट स्पीड देणार आहे.
वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन