बीएमएस निकाल ७०.२८ %
बीएमएस सत्र ५ च्या परीक्षेमध्ये एकूण १० हजार ६०१ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला १५ हजार ४५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ हजार ३५१ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ (Appeared) झाले होते. तर विद्यार्थी परीक्षेला १०६ अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ४४८२ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. बीएमएस सत्र ५ चा निकाल ७०.२८ टक्के लागला आहे.
बीकॉम अकाऊंट व फायनान्स निकाल ६३.३९ %
बीकॉम अकाऊंट व फायनान्स सत्र ५ च्या परीक्षेमध्ये एकूण ५ हजार ८२८ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ९ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार २३४ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ (Appeared) झाले होते. तर ६८ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ३३६६ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. बीकॉम अकाऊंट व फायनान्स सत्र ५ चा निकाल ६३.३९ टक्के लागला आहे.
या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
विद्यापीठाने आजपर्यंत २०२२ च्या हिवाळी सत्राचे १०४ निकाल जाहीर केले आहेत.