तर Samsung Galaxy S23 5G चा 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या फोनची मूळ किंमत ९५,९९९ इतकी आहे. पण ॲमेझॉनवर सध्या ब्लॉकबस्टर वॅल्यू डीलमध्ये १७ टक्के ऑफ होऊन हा फोन ७९,९९९ रुपयांना मिळत आहे. तसंच जर तुम्ही HDFC कार्ड वापरत असाल तर तुम्हाला आणखी ५००० रुपयांच डिस्काउंट मिळणार आहे. यातील आणखी एक खास ऑफर म्हणजे ॲमेझॉनवर ३२ हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे. त्यामुळे जर एक्सचेंज ऑफर मिळवली तर हा फोन तब्बल ३७ हजार रुपयांनी स्वस्त मिळेल. पण इतकी सवलत मिळवण्यासाठी जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असली पाहिजे आणि ती जुन्या फोनच्या मॉडेलवरही अवलंबून असते.
Samsung Galaxy S23 5G चे फीचर्सही आहेत जबरदस्त
सॅमसंग गॅलेक्सी S23 5G च्या स्पेसिफिकेशन्सचा विचार कराल तर यामध्ये 2340×1080 पिक्सलचा रेझ्युलेशनसोबत ६.१ इंचेसचा डिस्प्ले दिला गेला आहे. हा फोन Dynamic AMOLED 2X Infinity-O FHD+ डिस्प्ले असून 120Hz चा रिफ्रेश रेट दिला गेला आहे. फोन 8GB रॅम आणि 256GB इतका इंटरनल स्टोरेज वेरियंट दिलं गेलं आहे. प्रोसेसरचं म्हणाल तर स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.
कॅमेराही आहे अफलातून
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसोबत तीन कॅमेरे दिले आहेत.ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसरसोबत एक 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक 10 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्सही देण्यात आली आहे. तसंच सेल्फिसाठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आङे. याशिवाय पॉवर बॅकअपसाठी 3900mAh ची बॅटरी दिली असून हा फोन अॅन्ड्रॉईड 13 व्हर्जनसोबत येत आहे.
वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?