Jio चा हा प्लान Airtel वर भारी!, २३ दिवसाची जास्त वैधता आणि फ्री १८२ जीबी डेटा

नवी दिल्लीःजिओ आणि एअरटेलकडून वार्षिक प्लान आणले आहेत. दोन्ही टेलिकॉम कंपन्या २९९९ रुपयात वार्षिक प्लान देत आहेत. परंतु, दोन्ही प्लानचे बेनिफिट्स वेगवेगळे आहेत. तुमच्यासाठी कोणता प्लान बेस्ट ठरू शकतो. कोणत्या प्लानमध्ये जास्त बेनिफिट्स सोबत जास्त वैधता मिळते. यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घ्या.

जिओचा २९९९ रुपयाचा प्लान
जिओचा २९९९ रुपयाचा प्लान मध्ये ३६५ दिवसाची वैधता मिळते. सोबत २३ दिवसाची एक्स्ट्रा वैधता ऑफर केली जाते. याच प्रमाणे जिओचा २९९९ रुपयाचा वार्षिक प्लान आहे. यात एकूण ३८८ दिवसाची म्हणजेच १३ महिन्याची वैधता मिळते. या प्लानमध्ये डेील २.५ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये एकूण ९१२.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये ७५ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. याशिवाय, यूजर्स अनलिमिटेड फ्री ५जी डेटा मिळू शकतो. सोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय, रोज १०० एसएमएसची सुविधा दिली जाते. प्लानमध्ये फ्रीमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडचे सब्सक्रिप्शन दिले जाते.

एअरटेलचा २९९९ रुपयाचा प्लान
जिओच्या या प्लानमध्ये डेली २ जीबी डेटा दिला जातो. याच प्रमाणे एकूण ७३० जीबी डेटा दिला जातो. जिओप्रमाणे अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. तसेच रोजच्या हिशोबाप्रमाणे १०० एसएमएस दिले जाते. हा प्रीपेड प्लान ३६५ दिवसाच्या वैधते सोबत येतो. जर अतिरिक्त बेनिफिट्सचा विचार केला तर यात Apollo 24|7 Circle बेनिफिट, फास्टॅगच्या खरेदीवर १०० रुपये कॅशबॅक, फ्री हॅलो ट्यून आणि Wynk म्यूझिकचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. या प्लानमध्ये फ्री मध्ये अनलिमिटेड ५जी डेटा ऑफर केला जात आहे.

वाचाःस्वस्त मिळतोय म्हणून हा फोन खरेदी करू नका, ६ महिन्यांनंतर पश्चाताप होईल

कोणता प्लान आहे बेस्ट
जिओचा २९९९ रुपयाचा प्लान एअरटेलच्या तुलनेत २३ दिवसाची वैधता जास्त देत आहे. सोबत या प्लानमध्ये जास्त डेटा दिला जात आहे. तसेच जास्त ओटीटी सब्सक्रिप्शन सुद्धा मिळत आहे.

वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

Source link

Airtel Planairtel plans in indiajio plan listjio plans offerJio Vs airtel Planjio vs airtel plans
Comments (0)
Add Comment