OnePlus Pad वरून असे म्हटले जात आहे की, यात १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज दिले जाऊ शकते. याशिवाय, या पॅड मध्ये 9510mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. ज्या सोबत 67W SUPERVOOC फास्ट चार्जिंग मिळू शकते. OnePlus Pad ची किंमत ३९ हजार ९९९ रुपये असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, यासोबत बँक ऑफर्स सुद्धा मिळू शकते. वनप्लस पॅडची विक्री भारतात २८ ते ३० एप्रिल दरम्यान सुरू होऊ शकते.
वाचाःस्वस्त मिळतोय म्हणून हा फोन खरेदी करू नका, ६ महिन्यांनंतर पश्चाताप होईल
OnePlus Pad ची विक्री हालो ग्रीन कलर आणि सिंगल १२ जीबी रॅम सोबत २५६ जीबी स्टोरेज मध्ये होईल. टॅब मध्ये अँड्रॉयड १३ मिळेल. यात ११.६१ इंचाची एलसीडी डिस्प्ले आहे. यासोबत डायनामिक रिफ्रेश रेट मिळेल. जे १४४ Hz पर्यंत असेल. डिस्प्लेचा ब्राइटनेस ५०० निट्स असेल. डिस्प्ले सोबत डॉल्बी व्हिजन आणि एचडीआरचा सपोर्ट मिळेल. वनप्लस पॅड सोबत १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळेल. ज्यात इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलायझेशन मिळेल. सेल्फीसाठी या टॅब मध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. वनप्लस पॅड मध्ये स्मार्टफोन सोबत ५जी सेल्युलर शेअरिंगची सुविधा आहे. टॅबलेटमध्ये क्वॉड स्पीकर सेटअप सोबत डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी एटमॉसचा सपोर्ट दिला आहे.
वाचाःJio चा हा प्लान Airtel वर भारी!, २३ दिवसाची जास्त वैधता आणि फ्री १८२ जीबी डेटा
वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?