तर हा कंपनीचा एन्ट्री लेव्हलचा म्हणजेच सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन आहे. यामध्ये एकूण 50GB डेटा देण्यात येतो. विशेष म्हणजे ऑनलाईन सब्सक्राईब करणाऱ्यांसाठी 50GB अधिकचा डेटाही मिळणार आहे. हा प्लॅन 200GB डेटा रोलओव्हर बेनिफिटसह येणार आहे. ज्यामुळे रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत तुम्हाला अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. तसंच यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह ३००० एसएमएसही कंपनी देत आहे. वोडाफोन-आयडियाचा हा प्लॅन आणखी अधिकच्या फायद्यांसह येतोय यामध्ये तुम्हाला १२ महिन्यांसाठीचं सोनी लिव्हचं फ्री सब्सक्रिप्शनही मिळणार आहे. तसंच जी5 प्रीमियमचं फ्री अॅक्सिसही दिलं जाणार आहे. याशिवाय Vi Movies & TV अॅपचा फायदाही मिळणार आहे.
५०१ रुपयांचा ही आहे प्लॅन
वोडाफोन-आयडियाचा हा पोस्टपेड प्लॅन 90GB डेटासह मिळणार आहे. यातही 200GB डेटा रोलओव्हर बेनिफिट असणार आहे. तसंच रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत तुम्हाला अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. तसंच यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह ३००० एसएमएसही कंपनी देत आहे. याशिवाय ६ महिन्यांचं अॅमेझॉन प्राईमचं फ्री सब्सक्रिप्शन आणि डिज्नी हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन आणि जी५ असे सब्सक्रिप्शन दिले गेले आहेत.
वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?