JEE Advanced: जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा ४ जूनला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) व यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षा झाली होती. प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा होणार आहे. येत्या ४ जूनला देश-विदेशातील परीक्षा केंद्रांवर जेईई ॲडव्हान्स्ड २०२३ परीक्षा घेतली जाईल.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवेशासाठी ‘एनटीए’च्या माध्यमातून दोन सत्रांमध्ये जेईई मेन्स परीक्षा घेतली आहे. जानेवारीमध्ये पहिले सत्र झालेले असताना नुकतेच एप्रिल महिन्यात जेईई मेन्सचे दुसरे सत्र झाले होते. या दोन्ही परीक्षांना सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी सर्वोत्तम पर्सेंटाइल ग्राह्य धरून राष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली जाईल. या क्रमवारीच्या आधारावर जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्रता निश्चित होणार आहे.

परीक्षा नोंदणीला ३० पासून सुरुवात

दरवर्षी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा संयोजनाची जबाबदारी आयआयटी संस्थांना दिली जात असते. त्यानुसार यावर्षी आयआयटी गुवाहाटी यांच्याकडे परीक्षेच्या संयोजनाची जबाबदारी असेल. आयोजन संस्थेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी नोंदणीप्रक्रिया ३० एप्रिलपासून सुरू होईल.

परीक्षा अर्ज भरण्याची मुदत सात मेपर्यंत असेल. शुल्क भरण्याची मुदत ८ मेपर्यंत असेल. २९ मे ते ४ जून या कालावधीत प्रवेशपत्र उपलब्ध केले जातील. पहिला पेपर चार जून रोजी सकाळी नऊला, तर पेपर क्रमांक २ दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. जूनच्या अंतिम आठवड्यात निकाल जाहीर केला जाईल.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Source link

EducationengineeringJEE Advancedjee advanced datesjee advanced latest newsjee advanced newsJee ExamMaharashtra Timesजेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा
Comments (0)
Add Comment