श्री सदस्यांचे मृत्यू वेदनादायी, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री आठच्या सुमारास आले होते. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली.

गोमूत्र शिंपडण्याऐवजी थोडे प्या, शहाणपण येईल; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
यावेळी माध्यम प्रतिनीधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, उष्माघाताचा त्रास झाल्याने श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी काही श्री सदस्यांवर प्राथमिक उपचार केले. काहींना रुग्णालयात हलवावे लागले.

पुरंदरसाठी शिवतारे यांची अजित पवारांकडे साखर पेरणी?, पुरंदरची निवडणूक सोपे करण्याचे प्रयत्न
एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

शिंदे-फडणवीस सरकारबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला धोका नाही, त्या अफवा

Source link

AidAid of 5 lakh rsappasaheb dharmadhikariCM Eknath ShindeKhargharअप्पासाहेब धर्माधिकारीखासघरमहाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२२मुख्यमंत्री एकनाथ शिंदेश्री सदस्यांचे मृत्यू
Comments (0)
Add Comment