खाण्याच्या तेलाने करु शकता साफ
कधी-कधी आपल्या फोनचं स्क्रीनगार्ड तुटतं मग आपण ते काढून टाकतो. पण त्या स्क्रीनगार्डचा ग्लू तिथेच राहतो. त्याचा निशाणही तसाच राहतो. पण अशामध्ये जर तुम्ही खाण्याच्या तेलात कपडा टाकून त्याने स्क्रीन पुसून घेतली तर तो ग्लू राहणार नाही आणि त्यामुळे फोनची स्क्रीन पुन्हा चमकेल.
टूथपेस्टने करु शकता साफ
मोबाईल स्क्रीन चमकवण्यासाठी टूथपेस्टचा वापरही करु शकता. टूथपेस्टच्या वापराने स्क्रीनवरील दाग आणि इतर स्क्रॅचेस हटवले जाऊ शकतात. तर टुथपेस्टने साफ करताना तुम्हाला एका कापसाच्या बोळ्यावर थोडीशी टुथपेस्ट लावयची आहे. त्यानंतर तुमची स्क्रीन हळुवारपणे पुसून घ्या. स्क्रीनवरील दाग किंवा स्क्रॅचेस साफ होईपर्यंत पुसून अखेर एखाद्या वेट वाईपने स्क्रीन पुसू शकता.
वेट वाईप किंवा लिक्विड स्प्रेही आहे साफ करण्यासाठी बेस्ट
आजकाल आपण स्क्रीनगार्ड लावायला गेलो की तेथील दुकानदार वेट वाईप किंवा लिक्विड स्प्रेने स्क्रीन साफ करतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टीतर स्क्रीन साफ करण्यासाठी बेस्ट आहे. याची किंमतही अधिक नसून साफ करणंही सोपं आहे. त्यामुळे या सोप्या स्टेप्स वापरुन तुम्ही तुमची स्क्रीन अगदी नव्या सारखी चमकवू शकता.
वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?