लोकल प्रवासासाठी घातलेल्या अटींवर मुंबईकर नाराज; राज्य सरकारकडं केली ‘ही’ मागणी

हायलाइट्स:

  • सर्वसामान्यांसाठी १५ ऑगस्टपासून लोकल ट्रेन
  • प्रवासासाठी घातलेल्या अटीमुळं मुंबईकरांमध्ये नाराजी
  • एक डोस घेतलेल्यांनाही परवानगी देण्याची मागणी

मुंबई: लाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेली लोकल ट्रेन येत्या १५ ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी खुली होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी त्याबाबत घोषणा केली आहे. मात्र, लोकल प्रवासासाठी ठेवलेल्या अटींमुळं सर्वसामान्य मुंबईकरांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. (Mumbai Local Train Travelling)

कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्या येत्या १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र केवळ दोन डोस घेतले म्हणून लगेच प्रवास सुरू करता येणार नाही. दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण होणे गरजेचे आहे, ही पहिली अट आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून लसींचा तुटवड्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळं अनेकांना लस घेता आलेली नाही. खासगी रुग्णालयात उपलब्ध असलेली सर्वांनाच परवडणारी नाही. लसीचा एक डोस घेतल्यानंतर दुसरा डोस साधारणपणे ८४ दिवसांनंतर दिला जातो. मात्र, ८४ दिवसांनंतर दुसरा डोस घेऊ इच्छिणाऱ्यांना तो मिळेलच, याची शाश्वती नाही. मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र डोस नसल्यामुळं बंद आहेत. लसीसाठी नोंदणी करायचा प्रयत्न केल्यास अनेक केंद्रावर बुकिंग फुल झाल्याचं दाखवलं जातं. त्यामुळं दोन डोसची अट फारच जाचक असल्याचं मुंबईकरांचं म्हणणं आहे. त्यामुळं एक डोस घेतलेल्यांनाही लोकल प्रवासाची परवानगी सरकारनं द्यायला हवी, अशी मागणी मुंबईकर करत आहेत.

वाचा: राहुल गांधींविरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतून याचिका; काय आहे प्रकरण?

नव्या नियमानुसार, लोकल प्रवासाचा पास मिळवण्यासाठी पुन्हा ‘अॅप’वर नोंदणी करून पास घ्यावा लागणार आहे. स्मार्टफोन नसलेल्यांना वॉर्ड ऑफिसमध्ये किंवा उपनगरी रेल्वे स्थानकांवर पास घेता येणार आहे. बहुतेक कष्टकरी लोकांना अॅपअभावी वॉर्ड ऑफिसला जावे लागणा आहे. मात्र, वॉर्ड ऑफिसच्या वेळा सगळ्यांसाठीच सोयीच्या नाहीत. शिवाय, एकदा जाऊन हे काम होईलच असं नाही, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. हातावर पोट असलेल्यांना आपलं काम सोडून तिथं जाणं व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणं अडचणीचं ठरणार आहे. त्यामुळं सरकारनं काही वेगळा विचार करावा किंवा मागील वेळच्या प्रमाणे ठराविक कालावधीत सर्वांना प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी काहींनी केली आहे.

लोकल १५ ऑगस्टपासून सुरू होणार, मुख्यमंत्र्याची घोषणा

करोनाच्या पहिल्या लाटेनंतर लोकल प्रवासाला परवानगी देताना सरकारनं सकाळी ७ च्या आधी, दुपारी १२ ते ४ आणि रात्री ९ नंतर प्रवासाची मुभा दिली होती. त्याच धर्तीवर यावेळी देखील सवलत द्यावी, असं मुंबईकरांचं म्हणणं आहे.

वाचा: चांगली बातमी! धारावीत आठव्यांदा शून्य करोनारुग्ण

Source link

Local Train For Fully Vaccinated PeopleMarathi Breaking Newsmumbai local train latest newsmumbai local train updatesUddhav Thackerayमुंबई लोकल ट्रेन
Comments (0)
Add Comment