Google ला मोठा झटका, सॅमसंग, ॲपल डिफॉल्ट ब्राउजर हटवणार, 'हे' आहे कारण

नवी दिल्ली :Google Search Engine : सर्च इंजिन म्हटलं की गुगल हेच आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतं. मागील बऱ्याच काळापासून गुगलच सर्च इंजिन म्हणून प्रसिद्ध आहे. सर्च इंजिनच्या जगात गुगलचा सुमारे ९० टक्के हिस्सा आहे. पण कदाचित आता गुगलचे वाईट दिवस सुरू झाले आहेत. कारण गुगलचा सर्च इंजिन म्हणून दबदबा कमी होत असून सॅमसंग आणि ॲपल सारख्या मोठ्या कंपन्यांनी गुगलपासून दूर होण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सॅमसंग आणि ऍपलच्या स्मार्टफोनमध्ये Google सर्च इंजिन बाय डिफॉल्ट दिले जात होते. यातून गुगलला दरवर्षी मोठी कमाई होत असे. पण आता गुगलच्या जागी मायक्रोसॉफ्ट बिंग सर्च इंजिन म्हणून अधिक प्रसिद्ध होत आहे.

मायक्रोसॉफ्ट बिंगची मागणी वाढली

AI तंत्रज्ञानावर आधारित सर्च इंजिन मायक्रोसॉफ्ट बिंग बाजारात आता दाखल झाले आहे, जे सर्चिंगच्या बाबतीत गुगलपेक्षा खूपच सरस आहे. अशा परिस्थितीत सॅमसंगने गुगलचे डिफॉल्ट सर्च इंजिन सोडून आपल्या स्मार्टफोनमध्ये बिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे गुगलला आपल्या तोट्याची चिंता सतावू लागली आहे. आतापर्यंत सॅमसंग फोनमध्ये Google सर्च इंजिन बाय डिफॉल्ट देऊन, Google कंपनीला वार्षिक सुमारे $3 अब्ज महसूल मिळत होता. अशा परिस्थितीत गुगलचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, ॲपलने सॅमसंग प्रमाणे आपल्या स्मार्टफोनमध्ये Bing सर्च इंजिन देण्यास सुरुवात केली, तर ते Google ला दरवर्षी मोठा तोटा होणार आहे.

गुगलही दोन हात करण्यास सज्ज

गुगलला आपल्या व्यावसायाबद्दल चिंता वाटू लागली आहे. ज्यामुळे गुगलने नवीन एआय आधारित सर्च इंजिनवर काम सुरू केले आहे, जे कंपनी लवकरच लॉन्च करू शकते. यासाठी गुगलने मॅगी या नवीन प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे, जे ChatGPT सारखे AI चॅटबॉट्स तयार करेल. 2022 मध्ये गुगल सर्चचा व्यवसाय सुमारे $162 बिलियन होता. मात्र, एआय आधारित सर्च इंजिनमुळे गुगलचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

वाचा :Netflix, Prime, Hotstar: आता अनलिमिटेड मूव्हीसह, वेब सीरीजचीही घ्या मजा, पाहा सर्व प्लॅन्सची माहिती सविस्तर

Source link

applegoogle newsgoogle search enginesamsungगुगलमायक्रोसॉफ्ट बिंग
Comments (0)
Add Comment