Air Cooler for Home: प्लॅस्टिक की मेटल? कोणता कूलर तुमच्यासाठी बेस्ट?

नवी दिल्ली :Air Cooler Buying Tips : आता उन्हाळा सुरु झाला असून दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. अशामध्ये दुपारच्या वेळेला तर घरात बसणं कठीण होतं. अशामध्ये एसीसारखं डिव्हाईस तुम्हाला गर्मीतही थंडीचा अनुभव देईल पण एसीची किंमत मेंटेनन्स न परवडणाऱ्यांसाठी कूलर हा बेस्ट पर्याय आहे. पण मेटल आणि प्लॅस्टिक असे दोन प्रकारचे कूलर बाजारात विकले जात आहेत. आता यापैकी एक कोणता निवडावा याचा देखील विचार करावा लागेल. तर यासाठी दोन्ही प्रकारच्या कूलरबद्दल महत्त्वाचे मुद्दे पाहू…

प्लास्टिक एअर कूलर
प्लॅस्टिक एअर कूलर हलके आणि इकडून तिकडे हलवायला सोपे असतात, ज्यामुळे ते घराच्या किंवा ऑफिसच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वापरण्यासाठी बेस्ट आहे. तसंच किंमतीच्या बाबतीतही ते मेटल एअर कूलरपेक्षा अधिक परवडणारे असतात, हा अनेक लोकांसाठी एक महत्त्वाचा घटक आहे. प्लॅस्टिक एअर कूलर डिझाईन्स, रंग आणि आकारांच्या आधारे वेगवेगळ्या पर्यायात उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुमच्या आवडीचे कूलर शोधणे सोपे होते.
तसंच या प्लॅस्टिक कूलर्समधून विद्युत प्रवाह जात नसल्याने लहान मुले किंवा पाळीव प्राणी असलेल्या घरांमध्ये वापरण्यासाठी हे सेफ असतात. प्लॅस्टिक एअर कूलरला ऑपरेट करण्यासाठी कमी वीज लागते, ज्यामुळे कमी वीज बिल येऊ शकते. मात्र, प्लॅस्टिक एअर कुलरचे काही तोटेही आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते धातूच्या एअर कूलरइतके कूलिंग देत नाहीत. तसंच ते फार काळ टिकत नाहीत.

मेटल एअर कूलर

जास्त भारी कूलिंग हवं असल्यास मेटल एअर कूलर हा एक उत्तम पर्याय आहे. हे प्लॅस्टिक एअर कूलरपेक्षा महाग आहेत, परंतु ते अनेक फायदे देखील देतात. मेटल एअर कूलर मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या परिसरात थंड करण्यास सक्षम आहेत. मेटल कूलरमध्ये मजबूत मोटर आणि पंखा असतो, जो जास्त हवा फेकण्याचे काम करतो. मेटल एअर कूलर प्लॅस्टिक कूलरपेक्षा अत्यंत टिकाऊ असतात. त्याचं डिझाइन टिकाऊ असतं. याचा अर्थ प्लास्टिकच्या एअर कूलरपेक्षा मेटल कूलर जास्त काळ टिकू शकतात. मेटल एअर कूलरचे काही तोटेही आहेत. प्लॅस्टिक एअर कूलरपेक्षा हे कूलर अधिक मोठे असतात, ज्यामुळे त्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे ठेवणे अवघड असते.

वाचाःमुंबईकरासाठी आनंदाची बातमी, Apple कंपनीचं देशातलं पहिलं रिटेल स्टोर बीकेसीत,पहिला फोटो आला समोर

Source link

buying cooler tipscoolercooler guidemetal coolerplastic coolerकूलरकूलर टिप्स
Comments (0)
Add Comment