नवी दिल्ली :Samsung Galaxy M14 5G launched : Samsung ने आज Galaxy M14 5G हा फोन भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये कंपनीने 50MP ट्रिपल कॅमेरा, 6000mAh बॅटरी, 5nm प्रोसेसर आणि अनेक दमदार फीचर्स दिले आहेत. विशेष म्हणजे हा फोन केवळ १३४९० या बजेट प्राईसमध्ये ठेवण्याच आला आहे. तर या फोनच्या काही खास फीचर्सवर नजर फिरवू….बॅटरी:6000mAh अशा मोठ्या बॅटरीसह, कंपनीने या फोनला ‘पॉवर मॉन्स्टर’ म्हटलं आहे. कंपनीचा दावा आहे की फोन चार्जिंगशिवाय दोन दिवस टिकू शकतो. तुम्ही या फोनवर नॉन-स्टॉप तास पाहू शकता. स्मार्टफोन 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
प्रोसेसर:कंपनीने Galaxy M14 5G ला ‘परफॉर्मन्स मॉन्स्टर’ देखील म्हटलं आहे. यात 5nm Exynos 1330 प्रोसेसर आहे. उत्तम गेमिंग अनुभवासाठी, यात पॉवर-कार्यक्षम CPU संरचना आणि 3D ग्राफिक्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम सह रॅम प्लस फीचर देखील देण्यात आले आहे.
प्रोसेसर:कंपनीने Galaxy M14 5G ला ‘परफॉर्मन्स मॉन्स्टर’ देखील म्हटलं आहे. यात 5nm Exynos 1330 प्रोसेसर आहे. उत्तम गेमिंग अनुभवासाठी, यात पॉवर-कार्यक्षम CPU संरचना आणि 3D ग्राफिक्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम सह रॅम प्लस फीचर देखील देण्यात आले आहे.
डिस्प्ले:फोनमध्ये 6.6” फुल HD + 90Hz डिस्प्ले आहे. डिस्प्लेसाठी गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. फोन 13 5G बँडला सपोर्ट करतो. यासोबतच कंपनीने या फोनला ४ वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स आणि २ वर्षांसाठी OS अपग्रेड मिळतील, असंही सांगितलं आहे.
किंमतीचं काय?
हा फोन तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे- Icy Silver, Berry Blue आणि Smoky Teal. फोनची विक्री २१ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होईल. Amazon, Samsung आणि निवडक रिटेल स्टोअर्सवर हा फोन उपलब्ध असेल. सुरुवातीची ऑफर म्हणून Galaxy M14 5G 4+128GB व्हेरिएंटसाठी १३,४९०रुपये आणि 6+128GB व्हेरिएंटसाठी १४,९९९रुपयांना उपलब्ध असेल. हा फोन खरेदी करताना ग्राहक नो कॉस्ट ईएमआय ऑफर देखील घेऊ शकतात.
वाचा :Asus ROG Phone 7: जबरदस्त! 16GB पर्यंत RAM, 512GB पर्यंत स्टोरेज असणारा फोन भारतात लॉन्च