१८१ रुपयांचा एअरटेल रिचार्ज प्लॅन
एअरटेलचा 181 रुपयांचा रिचार्ज हा डेटा अॅड-ऑन प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे.
एअरटेलचा १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
एअरटेलच्या १९९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण ३ जीबी डेटा ऑफर करण्यात आला असून यामध्ये ९९ रुपयांची टॉकटाइम व्हॅल्यूही आहे. तर कॉल रेट म्हणाजल तर या प्लॅनमध्ये ग्राहक २.५ पैसे प्रति सेकंद दराने लोकल आणि एसटीडी कॉल करू शकतात.
२९६ रुपयांचा एअरटेल रिचार्ज प्लॅन
एअरटेलच्या २९६ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉल मिळतात. ग्राहक दररोज १०० एसएमएस मोफत पाठवू शकतात. या प्लॅनची वैधता ही ३० दिवसांची आहे आणि संपूर्ण कालावधीसाठी वापरकर्त्यांना एकूण २५ GB डेटा ऑफर केला जातो. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ओटीटी मेंबरशिपही मोफत उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ३० दिवसांसाठी Amazon Prime Mobile Edition मेंबरशिप मोफत दिली जाते. याशिवाय, अपोलो 24|7 सर्कल, शॉ अकादमीचा मोफत ऑनलाइन कोर्स, फास्टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक, फ्री हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्शन रिचार्ज पॅकमध्ये उपलब्ध आहेत.
४८९ रुपयांचा एअरटेल रिचार्ज प्लॅन
एअरटेलच्या ४८९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग दिलं जातं. या प्लॅनमध्ये 300 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. या पॅकची वैधता ३० दिवसांची असून युजर संपूर्ण ३० दिवसांसाठी ५० जीबी डेटा वापरु शकतो. याशिवाय एअरटेलच्या या रिचार्जमध्ये तुम्ही मोफत Apollo 24|7 Circle, मोफत Hellotunes, Wynk Music चा लाभ घेऊ शकता.
वाचा :Asus ROG Phone 7: जबरदस्त! 16GB पर्यंत RAM, 512GB पर्यंत स्टोरेज असणारा फोन भारतात लॉन्च