​चूकून चूकीच्या UPI ID वर पैसे पाठवले? चिंता नको, 'या' सोप्या स्टेप्स करा फॉलो आणि मिळवला पूर्ण रिफंड

How to Retrieve Wrong UPI Payment : युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय (UPI) हे आजकाल सर्वाधिक व्यवहार होण्याचं साधन बनलं आहे. म्हणजे अगदी एखाद्या छोट्या दुकानांत चॉकलेट खरेदी करत असाल किंवा ज्वेलर्समध्ये सोनं खरेदी करत असाल यूपीआय पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. भारतातील UPI आधारित अॅप्स PayTM, PhonePe, GPay खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या मदतीने, वापरकर्ते UPI ID किंवा QR कोड स्कॅन करून पैशांचा व्यवहार करत असतात. पण या व्यवहारांत कधी-कधी वापरकर्ते घाईघाईने चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करु शकतात. पण असं झालं तरी घाबरण्याचं कारण नाही. आज आम्ही तुम्हाला चुकीच्या खात्यात ट्रान्सफर केलेले पैसे कसे परत मिळवू शकता ते सांगणार आहोत.

सर्वात आधी UPI कस्टमर सपोर्टशी संपर्क साधा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणत्याही वापरकर्त्याने ज्याने चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवले आहे, त्याने आधी संबधित अॅपच्या कस्टमर सपोर्टशी संपर्क साधावा म्हणजेच Gpay, PhonePe, Paytm किंवा कोणत्याही इतर युपीआय अॅपद्वारे व्यवहार केला असल्यास त्यांच्या कस्टमर सपोर्टशी संपर्क साधावा. त्यांच्याकडूनच संपूर्ण मदत मिळणार आहे.

​वाचा :SmartPhone Care : मोबाईलची स्क्रीन घरच्या घरी कशी कराल साफ? सोप्या तीन स्टेप्सने चमकेल तुमचा स्मार्टफोन

​BHIM टोल फ्री क्रमांकावर कॉल करा

तुम्ही चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले असल्यास तुम्ही एक गोष्ट करू शकता ती म्हणजे BHIM ॲपच्या कस्टमर केअरशी बोलणं ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे. भीम कस्टमर केअरसाठी टोल फ्री क्रमांक १८००१२०१७४० आहे. या नंबरवर कॉल करून, तुम्ही संपूर्ण तपशील सांगू शकता, ज्यानतंर तुम्हाल रिफंड मिळण्यात मदत होईल.

​वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

बँकेशी संपर्क साधा

UPI द्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होत असतील तर नक्कीच तुमच्या बँकेशी संपर्क साधा. कारण हा बँकिंग व्यवहार असल्यामुळे बँकेला संपर्कात ठेवणं महत्त्वाचं आहे. यावेळी व्यवहार आयडी, खाते क्रमांक, प्राप्तकर्त्याचा UPI आयडी, फोन नंबर यासारखे संपूर्ण तपशील बँकेसोबत शेअर करा. तुम्ही बँक व्यवस्थापनाच्या मदतीने रिफंड मिळवू शकता.

​वाचा : ​Netflix, Prime, Hotstar: आता अनलिमिटेड मूव्हीसह, वेब सीरीजचीही घ्या मजा, पाहा सर्व प्लॅन्सची माहिती सविस्तर

​NPCI पोर्टलवर तक्रार नोंदवा

UPI हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने विकसित केलेले आहे. त्यामुळे NPCI स्वतः UPI द्वारे सर्व व्यवहारांशी संबंधित शंकाचे, तक्रारींचे व्यवस्थापन करते. त्यामुळे तुम्ही चुकीच्या UPI आयडीवर पैसे ट्रान्सफर केले असल्यास याच NCPI कडे तक्रार करु शकता. काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही तक्रार दाखल करु शकता.

​वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

​कशी दाखल कराल NPCI वर तक्रार

1: सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये NPCI ची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.
2: आता तुम्हाला वरच्या मेनू बारमधील ‘What we do’ विभागात जावे लागेल.
3: येथे ड्रॉप डाउन मेनूमध्ये, तुम्हाला UPI वर टॅप करावे लागेल आणि Dispute Redressal Mechanism वर क्लिक करावे लागेल.
4: खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला तक्रार विभाग दिसेल.
5: आता तुम्हाला व्यवहाराचे स्वरूप निवडावे लागेल.
6: आता तुम्हाला इश्यू सेक्शनमध्ये “Incorrectly transferred to another account” निवडावे लागेल. यासोबतच तुम्हाला सर्व माहिती नीट भरून तुमची तक्रार नोंदवावी लागेल.

​वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

बँकिंग लोकपालशी संपर्क साधू शकता

तुम्ही केलेल्या तक्रारीवर लोकपाल नियुक्त केला जाईल. यासोबतच या प्रकरणाशी संबंधित अपडेट्ससाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या नियमित संपर्कात राहावे लागेल. दरम्यान तरीही निवारण झालं नाही तर RBI मार्गदर्शक तत्त्वे स्पष्टपणे सांगतात की बँक किंवा UPI अॅप 30 दिवसांच्या आत प्रतिसाद देण्यास अयशस्वी झाल्यास, तुमचा अर्ज नाकारला किंवा तुम्ही त्यांच्या प्रतिसादावर समाधानी नसाल, तर तुम्ही बँकिंग लोकपालशी संपर्क साधू शकता. तक्रार दाखल करण्यासाठी, तुम्हाला एका कागदावर संपर्ण समस्या लिहून पोस्टाद्वारे तक्रार पाठवावी लागेल. बँकिंग लोकपाल तुम्हाला नक्कीच मदत करतील.

​वाचाःJio Recharge: २४० रुपयात ८४ दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

Source link

Digital issueUPI IssueUPI PaymentWrong UPI Paymentयुपीआययुपीआय पेमेंट
Comments (0)
Add Comment