ह्याला उलट्या खोपडीचं राजकारण म्हणतात; संजय राऊत भाजपवर भडकले!

हायलाइट्स:

  • मुंबई लोकलबाबतच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून राजकारण
  • शिवसेना-भाजप पुन्हा आमनेसामने
  • संजय राऊत यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका

मुंबई: कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना येत्या १५ ऑगस्टपासून लोकल ट्रेन प्रवास करता येईल, असं राज्य सरकारनं जाहीर केलं आहे. मात्र, आता त्यावरून भाजप-शिवसेनेमध्ये राजकारण सुरू झालं आहे. राज्य सरकारनं निर्णय घेण्याआधी केंद्राशी चर्चा करायला हवी होती, असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. दानवे यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

राऊत दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. ‘करोना संसर्गाच्या धोक्यामुळं मुंबईत लोकल बंद आहे. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सरकारनं तो निर्णय घेतला आहे. करोना संसर्ग कमी होत असल्यामुळं मुख्यमंत्री लोकल सुरू करणारच होते. मात्र, निर्णय होणार हे कळताच भाजपनं आंदोलन सुरू केलं. भाजपवाले रुळावर झोपले. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील राज्य सरकारनं निर्णय घ्यावा, आम्ही पाठीशी आहोत. केंद्र सरकार लगेचच पुढील कार्यवाही करेल, असं म्हटलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेताच त्यांची भाषा बदलली आहे. आता त्यांनी शीर्षासन सुरू केलंय. ह्याला उलट्या खोपडीचं राजकारण म्हणतात,’ असा संताप राऊत यांनी व्यक्त केला आहे.

‘रेल्वे ही देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. कुठल्या राजकीय पक्षाची नाही. पण काही लोकांना तसं वाटतं. रेल्वे भाजपची नोकर आहे का?,’ असा सवाल राऊत यांनी केला आहे. ‘लोकल ट्रेन सुरू होणं ही मुंबई व महाराष्ट्रातील लोकांची गरज आहे. त्याबाबत राज्य सरकार निर्णय घेत असेल तर केंद्रात असलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांनी सहकार्य करायला हवं. अशा परिस्थितीत कुठलाही वाद, संघर्ष टाळता आला पाहिजे. तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघू हा काय प्रकार आहे?,’ असंही राऊत म्हणाले.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही एक भूमिका आहे. तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळं ते लोकलसाठी वाट पाहत होते. आता लोकभावना लक्षात त्यांनी निर्णय जाहीर केलाय. ज्याअर्थी, लोकलला परवानगी दिली आहे, त्या अर्थी राज्यातल्या प्रशासनानं रेल्वे मंत्रालयाला सूचना दिलीच असणार. शिवाय, १५ तारखेला अद्याप वेळ आहे. या मधल्या काळात मेल चेक करा. एवढी घाई का करताय?,’ असा सवालही राऊत यांनी केला आहे.

Source link

Mumbai Local Train Updatepolitics over mumbai local trainsanjay raut attacks raosaheb danveSanjay Raut in Delhishiv sena vs bjpरावसाहेब दानवेसंजय राऊत
Comments (0)
Add Comment