Apple Bank: Apple ने उघडली पहिली बँक, बचत खात्यावर मिळेल ४.१५ टक्के व्याज

नवी दिल्लीःआतापर्यंत Apple प्रोडक्ट मार्केटमध्ये होते. परंतु, आता फायनान्स मार्केटमध्ये सुद्धा Apple ची एन्ट्री झाली आहे. कंपनीने आपली पहिली बँक ओपन केली आहे. यासाठी कंपनीने गोल्डमॅन सॅच ग्रुप सोबत पार्टनरशीप केली आहे. Apple ने म्हटले की, बचत खात्यावर आणि Apple Card कार्डवर ४.१५ टक्के व्याज मिळणार आहे. जे फेडरल डिपॉझिट इंन्शूरेन्स कॉर्पोरेशनच्या तुलनेत १० पट जास्त आहे.

फेडरल डिपॉझिट इंन्शूरेन्स कॉर्पोरेशन आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर सरासरी ०.३७ टक्के व्याज देते. ॲपल बँकेची सुरुवात सध्या अमेरिकेत झाली आहे. याआधी गेल्या महिन्यात ॲपलने अमेरिकेत बाय नाउ, पे लेटरची सुविधा लाँच केली होती. ॲपल बँकेतून यूजर्स ५० डॉलर ते १ हजार डॉलर म्हणजेच ८३ हजार रुपयाचे ऑनलाइन लोन घेऊ शकतात. किंवा कोणतीही खरेदी करू शकतात.

अमेरिकेचे जवळपास ८५ टक्के रिटेल स्टोरवर ॲपल पे स्वीकार केले जातात. सर्वात खास म्हणजे हे ॲपल बँकेत तुम्हाला कमीत कमी डिपॉझिट ठेवण्यासाठी कोणतेही बंधन नाही. तुम्ही ॲपल वॉलेट वरून सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकता. परंतु, ॲपल बँकेची सुविधा अजून भारतात उपलब्ध नाही.

वाचाःMini portable cooler: उन्हाळ्यात थंडच थंड, किंमत फक्त १५०० रुपये

ॲपलने मुंबईत देशातील पहिले स्टोर लाँच केले आहे. ॲपलच्या या स्टोरच्या लाँचिंगवर ॲपलचे सीईओ टीम कूक भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित सोबत मुंबईतील प्रसिद्ध वडापावचा आनंद सुद्धा घेतला आहे. मुंबई नंतर ॲपलचे दुसरे स्टोर हे दिल्लीतील साकेत येथे २० एप्रिल रोजी ओपन करण्यात येणार आहे.

वाचाःभारतातील पहिलं Apple Store मुंबईत सुरू, २० भाषेत संवाद साधणार, जाणून घ्या सर्वकाही

Source link

Apple Bankapple storeapple store in indiaapple store mumbaiapple storesapple stores in indiaBank Rate
Comments (0)
Add Comment