जिओ फायबरचा ९९९ वाला प्लॅन
तर जिओ कंपनी या प्लॅनमध्ये ३,३०० जीबी डेटा वापरण्यासाठी देते. 150Mbps स्पीड या प्लॅनमध्ये मिळणार आहे. सोबतच अनलिमिटेड कॉलिंग या प्लॅनमध्ये आहे. याशिवाय अॅमझॉन प्राईम व्हिडीओ, डिज्नी प्लस हॉटस्टार, वूट सिलेक्ट, सोनी लिव्ह आणि जी5 असे खास ओटीटी सबस्क्रिब्शनही मिळणार आहेत.
एअरटेलचा ९९९ रुपयांचा प्लॅन
ज्यांना हायस्पीड इंटरनेट वापरायच त्यांच्यासाठी हा प्लॅन अगदी खास आहे. यात तब्बल 200Mbps स्पीड दिलं जाणार अूनन इंटरनेटसाठी ३३०० जीबी डेटा देण्यात आला आहे. यातही अनलिमिटेड कॉलिंग दिलं जाईल तसंच डिज्नी प्लस हॉटस्टर, अॅमेझॉन प्राईमचंही सबक्रिप्शन दिलं आहे.
वाचा :Netflix, Prime, Hotstar: आता अनलिमिटेड मूव्हीसह, वेब सीरीजचीही घ्या मजा, पाहा सर्व प्लॅन्सची माहिती सविस्तर
बीएसएनएल ९९९ रुपयांचा रिचार्ज
बीएसएनएल कंपनीचं नेटवर्क देखील हाय स्पीड आहे. एक जुनी नेटवर्क कंपनी म्हणून प्रसिद्ध बीएसएनएल चा ९९९ चा प्लॅनही तसा भारी आहे. यामध्ये तब्बल २टीबी म्हणजेच २००० जीबी डेटा देण्यात आला आहे. यातही डिज्नी हॉटस्टार आणि लायन्सगेटसह इतरही काही ओटीटी अॅपचं सब्सक्रिब्शन दिलं गेलं आहे.
वाचा :Asus ROG Phone 7: जबरदस्त! 16GB पर्यंत RAM, 512GB पर्यंत स्टोरेज असणारा फोन भारतात लॉन्च