असे म्हणतात आपले पाच ज्ञानेंद्रिये म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, गंध घेणे यांना देवघरात चालना मिळते. आणि संपूर्ण दिवस सकारात्मक जातो. ते असे, आपण दिवा पेटवतो किंवा कापूर जाळतो – दृष्टी, आरतीवर किंवा कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्यांना लावणे – स्पर्श, मूर्तीवर फुले वाहणे – फुलांच्या अरोमामुळे वास. कापूर व तुळशीपत्र घातलेले तीर्थ प्राशन करणे -चव. हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात ठेवलेले असते, त्यामुळे कफ-ताप असे आजारही जातात. म्हणून देवपूजा करताना तांब्याच्या भांड्यांना महत्व देण्यात आले आहे. आरती म्हणणे, घंटानाद व मंत्रोच्चारण – ऐकणे. अशा प्रकारे आपण देवघरातील आवश्यक तेवढी शुभ ऊर्जा स्वत:त सामावून घ्यायची असते. तेव्हा देवघराच्या स्वच्छतेलाही महत्व द्यावे परंतू देवघर कोणत्या दिवशी स्वच्छ करू नये आणि कोणत्या दिवशी स्वच्छ करावे, हे देखील माहित असणे गरजेचे आहे. पाहूया देवघराच्या साफसफाईसंबंधी कशी काळजी घ्यावी.
देवघरात ही एक वस्तू असावी
देवघरात देवघर झाडण्यासाठी एक झाडू जरूर ठेवावा कुंचा शक्यतो नको. देवघराच्या सफाईनंतर गंगाजल अवश्य शिंपडा, दिवा देखील साफ करूनच त्यात ज्योत पेटवा.
या दिवशी देवघराची स्वच्छता करू नका
घरात एक नियम बनवा, देवघराची साफसफाई प्रत्येक शनिवारी नक्की करा. देवघराची सफाई चुकूनही गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी करू नका.
देवाच्या मुर्ती आणि फोटोची अशी काळजी घ्या
जेव्हा देवघराची स्वच्छता कराल तेव्हा देवघरातील देवांच्या मुर्ती आणि फोटो जमीनीवर ठेऊ नका. त्यांना स्वच्छ ठिकाणी आणि स्वच्छ कपड्यात किंवा स्वच्छ भांड्यात ठेवा.
पूजेचे भांडे असे करा स्वच्छ
पूजेच्या भांड्याना अर्धा तास गरम पाण्यात भिजवून ठेवा, निंबू आणि सोडा टाकून भांड्यांना स्वच्छ करा. भांड्याना चमक येईल.
यामुळे सुख समृद्धी टिकून राहील
पूजा करताना एक कापूर हरहर महादेव म्हणून रोज पेटवा, यामुळे वास्तूदोष, पितृदोष नाहीशे होतील आणि घरात सुख समृद्धी नेहमी टिकून राहील.