दरम्यान Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ चे काही फीचर्स समोर आले आहेत.
वाचा :Netflix, Prime, Hotstar: आता अनलिमिटेड मूव्हीसह, वेब सीरीजचीही घ्या मजा, पाहा सर्व प्लॅन्सची माहिती सविस्तर
काय आहेत फीचर्स?
Realme 11 Pro आणि 11 Pro + मध्ये 6.7-इंचाचा AMOLED FHD+ डिस्प्ले असेल. प्रोसेसरबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही फोन डायमेंसिटी 1080 चिपसेटने सुसज्ज असतील. स्टोरेजबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोन्समध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB स्टोरेजचा पर्याय उपलब्ध असेल. बॅटरी बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी उपलब्ध असेल. प्रो मॉडेल 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल, तर Pro+ 67W फास्ट चार्जिंग ऑफर करेल. हे दोन्ही फोन Android वर आधारित Realme UI 4.0 वर काम करतील. सर्वात भारी गोष्ट म्हणजे Realme 11 Pro ला 100 मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा मिळेल. त्याच वेळी, Realme 11 Pro+ मध्ये 200-मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा दिला जाईल, अशी माहिती समोर येत आहे.
वाचा :Asus ROG Phone 7: जबरदस्त! 16GB पर्यंत RAM, 512GB पर्यंत स्टोरेज असणारा फोन भारतात लॉन्च