आजचे पंचांग आणि दिनविशेष १९ एप्रिल २०२३: दर्श अमावास्या, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती चैत्र २९, शक संवत् १९४५, चैत्र, कृष्ण चतुर्दशी, बुधवार, विक्रम संवत् २०८०, सौर वैशाख मास प्रविष्टे ६, रमजान २७, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १९ एप्रिल सन् २०२३. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, वसन्त ऋतु.राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. चतुर्दशी तिथी सकाळी ११ वाजून २४ मिनिटापर्यंत त्यानंतर अमावस्या तिथी प्रारंभ. रेवती नक्षत्र ११ वाजून ५३ मिनिटापर्यंत त्यानंतर अश्विनी नक्षत्र प्रारंभ, वैधृती योग दुपारी ३ वाजून २५ मिनिटापर्यंत त्यानंतर विष्कुंभ योग प्रारंभ.

शकुनी करण सकाळी ११ वाजून २४ मिनिटापर्यंत त्यानंतर नाग करण प्रारंभ. चंद्र रात्री ११ वाजून ५३ मिनिटापर्यंत मीन राशीत त्यानंतर मेष राशीत संचार करेल. आज पंचक समाप्त होईल.

सूर्योदय: सकाळी ६-२०,
सूर्यास्त: सायं. ६-५६,
चंद्रोदय: पहाटे ५-४०,
चंद्रास्त: सायं. ६-१७,
पूर्ण भरती: सकाळी ११-३४ पाण्याची उंची ४.५६ मीटर, रात्री ११-४१ पाण्याची उंची ४.४८ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ५-१३ पाण्याची उंची ०.४९ मीटर, सायं. ५-२६ पाण्याची उंची १.०१ मीटर.

दिनविशेष: दर्श अमावास्या, संत चिले महाराज पुण्यतिथी.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून २२ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५८ मिनिटे ते १२ वाजून ४२ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ४८ मिनिटे ते ७ वाजून १० मिनिटापर्यंत. अमृत काळ रात्री ९ वाजून ३६ मिनिटे ते ११ वाजून ७ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ११ वाजून ५५ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत. पंचक सकाळी ५ वाजून ५२ मिनिटे ते रात्री ११ वाजून ५३ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : दुर्गा सप्‍तशतीचा पाठ करा आणि पिंपळाला पाणी टाका.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 19 april 2023आजचे पंचांगआजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२दर्श अमावास्यादिनविशेषशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment