Xiaomi 13 Ultra चे फीचर्स
तर हा फोन इतर शाओमी फोन्सप्रमाणेच ड्युअल सिम (नॅनो) स्मार्टफोन आहे. यात 6.73 इंच AMOLED WQHD+ (3200 x 1440) डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे. टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे. फोन Android 13 वर आधारित MIUI 14 वर चालतो. हा फोन 4nm octa-core Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेटने सुसज्ज आहे. यामध्ये Adreno 740 GPU देण्यात आला आहे. हे 16GB पर्यंत LPPDR5X RAM आणि 1TB पर्यंत UFS 4.0 स्टोरेजसह येतो.
आता कॅमेऱ्याचं म्हणाल तर फोनमध्ये Leica-tuned रियर क्वाड कॅमेरा युनिट आहे. यात 50-मेगापिक्सलचा 1-इंचाचा IMX989 सेन्सर आहे. फोनमध्ये तीन 50-मेगापिक्सेल IMX858 सेन्सर आहेत. कॅमेरा ६ वेगवेगळ्या फोकल लेन्ससह येतो. याला Leica ने कस्टमाइज्ड Summicron लेन्स दिले आहेत. फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. कॅमेरा सेटिंग्जमध्ये स्ट्रीट फोटोग्राफीसाठी डिझाइन केलेला फास्ट शॉट मोड देखील समाविष्ट आहे. Xiaomi 13 अल्ट्रा 90W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी पॅक करते. कंपनीच्या मते, फोनमध्ये धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 रेटिंग आणि बायोमेट्रिक पडताळणीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
Xiaomi 13 Ultra ची किंमत
हा फोन ब्लॅक, व्हाइट आणि ग्रीन कलर वेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. Xiaomi 13 Ultra तीन स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. फोनचा 12GB रॅम आणि 256GB इनबिल्ट स्टोरेज CNY 5,999 (सुमारे ७१,६०० रुपये) ला लॉन्च करण्यात आला आहे. फोनचा मिड-रेंज 16GB + 512GB रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट CNY 6,499 (अंदाजे ७७,५०० रुपये) मध्ये खरेदी केला जाऊ शकतो. तर, फोनचा टॉप-ऑफ-द-लाइन 16GB + 1TB प्रकार CNY 7,299 (अंदाजे ८७,००० रुपये) मध्ये खरेदी केला जाऊ शकतो. भारतात हे फोन किती दिवसात लॉन्च केले जातील याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
वाचा :Asus ROG Phone 7: जबरदस्त! 16GB पर्यंत RAM, 512GB पर्यंत स्टोरेज असणारा फोन भारतात लॉन्च